advertisement

आनंदाचं घर झालं पोरकं! जुळ्या मुलांच्या स्वागताची तयारी करणाऱ्या वनरक्षकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Last Updated:

मुरूड तालुक्यातील सर्वे येथील रहिवासी असलेले सुरज सारंगे यांच्यासाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा होता.

News18
News18
रायगड : नशिबाचे खेळ किती क्रूर असू शकतात, याचा प्रत्यय देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. घरात जुळ्या मुलांच्या जन्माचा सोहळा आणि आनंदाचे वातावरण असतानाच काही तासांतच कुटुंबाचा कर्ता पुरुष नियतीने हिरावून नेला. अलिबाग वनविभागातील तिनविरा येथे कार्यरत असलेले वनरक्षक सुरज सारंगे यांचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रेवस-रेड्डी मार्गावरील एका धोकादायक खड्ड्याने एका कर्तव्यदक्ष तरुणाचा बळी घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मुरूड तालुक्यातील सर्वे येथील रहिवासी असलेले सुरज सारंगे यांच्यासाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा होता. त्यांना काही दिवसांपूर्वीच जुळी मुले झाली होती आणि ती दोन्ही बाळे शुक्रवारीच हॉस्पिटलमधून घरी आली होती. आपल्या चिमुकल्यांच्या स्वागताचा आनंद सुरज यांनी सोशल मीडियावर 'स्टेटस' ठेवून व्यक्त केला होता. मात्र, रात्री कामावरून घरी परतताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.
advertisement

नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, रेवस-रेड्डी मार्गावर सध्या रस्ते बांधणीचे काम सुरू आहे. येथे एका मोरीसाठी मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. रात्रीच्या अंधारात सुरज यांची दुचाकी या खड्ड्यात कोसळली. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा, बॅरिकेट्स, रेडियम पट्ट्या किंवा सूचना फलक लावलेले नव्हते. अंधारात हा खड्डा न दिसल्याने सुरज यांचा तोल गेला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement

दोषींवर कडक कारवाईची मागणी

या घटनेनंतर महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. कंत्राटदाराच्या आणि संबंधित प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळेच सारंगे यांचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार केवळ प्रशासकीय हलगर्जीपणामुळे हिरावला गेला आहे, अशा शब्दांत संघटनेने रोष व्यक्त करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

वडिलांचे छत्र हरपल्याने हळहळ 

advertisement
सुरज सारंगे हे अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचारी म्हणून परिचित होते. ज्या हातांनी जुळ्या लेकांना खेळवायचे होते, त्याच लेकांच्या आगमनानंतर काही तासांतच वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आनंदाचं घर झालं पोरकं! जुळ्या मुलांच्या स्वागताची तयारी करणाऱ्या वनरक्षकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement