Mumbai Indians : आला रे...मुंबई इंडियन्सच्या वाघाने डरकाळी फोडली,शिवाजी पार्कच्या मैदानावर धावांचा पाऊस, IPL मध्ये काही खरं नाही;VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर अद्याप आयपीएल 2026 च्या तारखा जाहीर झाल्या नाही आहेत. पण आयपीएलमधल्या सर्वच संघांनी मैदानात प्रॅक्टीसला सूरूवात केली आहे. रोहित शर्मा देखील अशाच प्रकारे आज मैदानात प्रॅक्टीसला सूरूवात केली होती.
Rohit Sharma Practice shivaji Park Ground : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा टी20 वर्ल्ड कप 2026 चा ब्रॅड अम्बेसेडर असल्याने तो वर्ल्ड कपमध्ये प्रचंड व्यस्त होता. पण आता वर्ल्डकप संपत आल्याने आणि काहीच दिवसात आयपीएल 2026 च्या हंगामाला सूरूवात होणार असल्याने रोहित शर्माने मैदानात प्रॅक्टीसला सूरूवात केली आहे.या त्याच्या प्रॅक्टीसचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरं तर अद्याप आयपीएल 2026 च्या तारखा जाहीर झाल्या नाही आहेत. पण आयपीएलमधल्या सर्वच संघांनी मैदानात प्रॅक्टीसला सूरूवात केली आहे. रोहित शर्मा देखील अशाच प्रकारे आज मैदानात प्रॅक्टीसला सूरूवात केली होती. रोहित शर्मा आज कोलकत्ता नाईट रायडर्सचा कोच अभिषेक नायर सोबत शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रॅक्टीसला पोहोचला होता.
या प्रॅक्टीस दरम्यान रोहित शर्माने अनेक तास सराव केला होता. या सरावा दरम्यान त्याने षटकार आणि चौकार मारले होते. रोहितची हा सराव पाहून अनेकांनी मुंबई इंडियन्सच्या वाघाने डरकाळी फोडल्याची भावना व्यक्त केली होती. रोहित शर्माचा हा सराव पाहता मुंबई इंडियन्ससाठी ही गुडन्यूज आहे.कारण रोहित शर्मा त्याच्या सरावावर चांगलं लक्ष देत आहे.कारण ज्याप्रमाणे त्याचा अनुभव आहे तो आरामात प्रॅक्टीसला सूरूवात करू शकला असता पण तसे न करता त्याने प्रॅक्टीसला प्राधान्य दिलं आहे.
advertisement
Rohit Sharma practicing at the Shivaji Park. pic.twitter.com/hkM9kCAt1K
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 7, 2026
मागच्या वर्षी रोहित शर्मा टीम इंडिया संघाचा भाग होता आताही वनडे फॉरमॅटचा फक्त भाग आहे.त्यामुळे त्याला त्याच्या फिटनेसवर चांगल लक्ष देता आहेत. त्यामुळे त्याचा रिझल्ट आपल्याला मैदानात पाहायला मिळाला होता.रोहित शर्माने त्यावेळी मैदानात शतकीय खेळी केली होती.त्यामुळे रोहितच्या खेळात सूधार झाल्याचे पाहायला मिळाले होते आणि त्याच्या फिल्डींगमध्ये सुधार झाला होता.
advertisement
दरम्यान आता ज्याप्रमाणे रोहित शर्मा प्रॅक्टीस करतो आहे, त्याप्रमाणे आयपीएलमध्ये काही खरं नाही आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या बॅटीतून धावांचा पाऊस पडताना बघता येणार आहे.त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना रोहित शर्माच्या बॅटींगची उत्सुकता लागली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 9:34 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : आला रे...मुंबई इंडियन्सच्या वाघाने डरकाळी फोडली,शिवाजी पार्कच्या मैदानावर धावांचा पाऊस, IPL मध्ये काही खरं नाही;VIDEO










