महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी आज लाडक्या बाप्पााला निरोप दिला. गेल्या 27 ऑगस्टला बाप्पांचे घरोघरी आगमन झाले होते, त्यानंतर आज 11 दिवसांनी 6 सप्टेंबरला बाप्पांना निरोप देण्यात आला होता.या दरम्यान 11 दिवस मनोभावे सेवा करण्यात आली होती,त्यांच्या खास पाहुणचारही झाला होता.यानंतर गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आज त्यांना निरोप देण्यात आला होता.पण गणेशभक्तांची बाप्पाने पुढच्या वर्षी लवकर यावे अशी इच्छा व्यक्त केली असली तरी बाप्पााने उशिरानेच येणार आहेत.
advertisement
2026 चा गणेशोत्सव कधी?
हिंदू दिनदर्शिकेनुसार, पुढील वर्षी 2026 ला सप्टेंबर महिन्यात बाप्पांचे आगमन होणार आहे. 14 सप्टेंबरला बाप्पांचे आगमन होणार आहे तर 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल.त्यामुळे यंदाच्या तारखेनुसाप पाहिल्यास पुढील वर्षी बाप्पाच्या आगमनासाठी भक्तांना 18 दिवस जास्त वाट पाहावी लागणार आहे. तसेच पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला गौरी आवाहन असणार आहे आणि 18 सप्टेंबरला गौरी पूजन केले जाईल. त्यामुळे पुढच्या वर्षी गणेशभक्तांना वाट पाहावी लागणार आहे.
गणरायाला दुर्वा का वाहतात?
गणपतीला दुर्वा अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे, अनलासूर नावाचा एक राक्षस होता. तो देवांना आणि ऋषींना प्रचंड त्रास द्यायचा. सर्वजण त्याच्या त्रासाला कंटाळले होते. अखेर सर्व देव आणि ऋषी गणपतीकडे गेले. त्यांनी गणपतीसमोर आपली व्यथा मांडली. त्यावेळी गणपती खूप लहान होते पण त्यांची कीर्ती मात्र मोठी होती. बाप्पाने थेट अनलासुराशी युद्ध केलं. तेव्हा अनलासुरानं गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला. मग मात्र, गणरायानं रुद्ररूप धारण करून अनलासुरावर मात केली. अनलासुराला जिवंत गिळलं.
अनलासुराला गिळल्यानंतर बाप्पाच्या शरिराचा खूप दाह झाला. ऋषींनी अनेक उपचार केले पण, दाह काही शांत होत नव्हता. अखेर ऋषींनी बाप्पाच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या तेव्हा त्याचं शरीर थंड झालं. त्यानंतर बाप्पानं सर्व देवांना आणि ऋषींना आशीर्वाद दिला की, जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन. तेव्हापासूनच गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्याची परंपरा सुरू झाली. गणपतीला 21 दुर्वांची जुडी वाहिली जाते. गावखेड्यांमध्ये हरळ नावाचं गवत आढळतं. हे हरळ म्हणजेच दुर्वा असतात.