गणेशोत्सव म्हणजे कोकणातल्या लोकांच्या हृदयाजवळचा विषय. मग गावाला जायला किती तिकीट असो, गावी जायचं, गणेशोत्सवासाठी महिनाभर आधीपासून सगळ्या गाड्या फुल्लं आहेत. बाप्पाच्या दर्शनाला गावी जाण्यासाठी राज्य सरकारने विशेष एसटी बस सुरू केल्या आहेत. भारतीय रेल्वेनं यंदा 380 गणेशोत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
380 गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये मध्य रेल्वेच्या 296, पश्चिम रेल्वेच्या 56, कोकण रेल्वेच्या 6 आणि दक्षिण रेल्वेच्या 22 फेऱ्यां असतील अशी माहिती मिळाली आहे. या विशेष गाड्यांचे थांबेही वाढवण्यात आले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त प्रवाशांना प्रवास कमी पडेल आणि प्रवास सुखरुप होईल. यंदाचा गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत साजरा होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष ट्रेन 11 ऑगस्टपासूनच सुरू करण्यात आल्या आहेत.
advertisement
Farmer Success Story: शेतकऱ्याची कमाल, 13 गुंठ्यात केली घेवड्याची लागवड, उत्पन्न मिळणार लाखात! Video
या गाड्या कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर धावणार आहेत. या विशेष रेल्वेगाड्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणार आहेत, ज्यात कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे, मुंबई, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, रत्नागिरी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, राजापूर, वेंगुर्ला आणि गोव्यातील मडगाव, काणकोण, थिवीम, करमाळी, वास्को, यांसारख्या शहरांचा समावेश आहे.
प्रवाशांना या विशेष रेल्वे सेवांबद्दल अधिक माहिती IRCTC च्या वेबसाइटवर, रेल्वे वन ॲपवर आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी होणार आहे. याशिवाय पनवेल चिपळूण गणपती विशेष प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सुरू करण्यात आल्या आहेत.
