डोक्यावर ऊन आणि तासनतास उभं राहून पाय दुखले. उन्हात गॅससाठी उभं राहिलेल्या तरुणाला अचानक भोवळ आली. गॅससाठी उन्हात उभारल्यानंतर तरुणाला चक्क आली. त्यानंतर आजूबाजूच्यांनी त्याला पाणी देऊन, शुद्धीवर आणलं. सोलापुरातल्या कुमठा नाका परिसरातील गॅस एजन्सी समोरील घटना घडली. असमद रफिक शेख असे भोवळ आलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. गॅस सिलिंडरबाबत ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होत असल्याचं दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे.
advertisement
केवायसीचा अडथळा आणि सर्व्हरचा खोळंबा
केवळ ऊनच नाही, तर गॅस एजन्सींकडून दिली जाणारी कारणं नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहेत. "सर्व्हर डाऊन आहे," "वेळ संपली आहे," अशा उत्तरांमुळे तासनतास रांगेत उभा असलेला ग्राहक वैतागून जात आहे. या त्रासाचा कडेलोट आज जुने विडी घरकुल परिसरातील **'साई राम गॅस एजन्सी'**वर पाहायला मिळाला.
एजन्सीवर दगडफेक, महिला ग्राहक जखमी
ई-केवायसी होत नसल्याने संतप्त झालेल्या सोमनाथ धनुरे नावाच्या ग्राहकाचा एजन्सी चालकांशी जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सोमनाथने रागाच्या भरात एजन्सीवर दगडफेक केली. दुर्दैवाने, त्याने मारलेला दगड तिथेच रांगेत उभ्या असलेल्या एका महिला ग्राहकाच्या डोक्याला लागला, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
पोलीस कारवाई आणि वाढता संताप
दगडफेक करणाऱ्या सोमनाथ धनुरे याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उन्हाची तीव्रता पाहता गॅस एजन्सींनी सावलीची किंवा टोकन पद्धतीची व्यवस्था का केली नाही? आणि वारंवार सर्व्हर डाऊन का होतोय? असा संतप्त सवाल सोलापूरकर विचारत आहेत.
