TRENDING:

मध्यरात्री बिनसलं, महिलेनं घरातच पाडला रक्ताचा सडा, प्रियकराचा खेळ खल्लास, कराडमधील खळबळजनक घटना!

Last Updated:

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या आगाशिवनगर परिसरात मंगळवारी पहाटे रक्तरंजित थरार घडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल पाटील, प्रतिनिधी कराड: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या आगाशिवनगर परिसरात मंगळवारी पहाटे रक्तरंजित थरार घडला आहे. इथं एका महिलेनं आपल्या प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. तिने कुऱ्हाडीने वार करत प्रियकराचा जीव घेतला आहे. आरोपी महिला एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने प्रियकराची हत्या केल्यानंतर स्वत: पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संशयित आरोपी महिलेला तत्काळ ताब्यात घेतलं आहे.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र मरीआप्पा काळे (वय ४५, रा. शिवाजी स्टेडियमच्या पाठीमागे, कराड) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर सारिका चंद्रकांत कोळी (रा. इगवले वस्ती, आगाशिवनगर) असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी महिलेचं नाव आहे. राजेंद्र आणि सारिका यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात सर्वकाही आलबेल सुरू नव्हतं. चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद सुरू होता.

advertisement

चारित्र्याच्या संशयावरून वाद

मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास राजेंद्र हा सारिकाच्या घरी होता. यावेळी राजेंद्रने पुन्हा एकदा सारिकावर संशय व्यक्त केल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि संतापलेल्या सारिकाने घरातील कुऱ्हाडीने राजेंद्रवर सपासप वार केले. हे वार इतके भीषण होते की, राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात

advertisement

या घटनेची माहिती मिळताच कराड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी आरोपी महिला सारिका कोळी हिला ताब्यात घेतले असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं महाराष्ट्राचं मन जिंकलं! ‘मयुरी’चं डोहाळे जेवण असं केलं, की सगळीकडे..
सर्व पहा

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हा सारिकावर वारंवार चारित्र्यावरून संशय घेत होता. याच संशयावरून त्यांच्यात सतत खटके उडत असत. मंगळवारी पहाटे झालेल्या वादात सारिकाचा संयम सुटला आणि तिने हे टोकाचं पाऊल उचललं. कराड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. भरवस्तीत झालेल्या या खुनाच्या घटनेने आगाशिवनगरमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मध्यरात्री बिनसलं, महिलेनं घरातच पाडला रक्ताचा सडा, प्रियकराचा खेळ खल्लास, कराडमधील खळबळजनक घटना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल