का घेतला हा निर्णय?
मसाई पठारावरील समृद्ध जैविक विविधतेचे जतन करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाने या 5.34 चौरस किलोमीटरच्या परिसराला 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे येथील वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. याच संवर्धनाच्या दृष्टीने पर्यटकांकडून नाममात्र शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाचगणीपेक्षाही विस्तीर्ण असलेले पठार
advertisement
- पन्हाळ्यापासून अवघ्या 8 किलोमीटरवर असलेले हे पठार हिरव्यागार गवताची शाल पांघरल्यासारखे दिसते.
- हे पठार पाचगणीच्या टेबल लँडपेक्षाही मोठे असून, याची लांबी सुमारे 4 ते 5 किलोमीटर आहे.
असे असेल प्रवेश शुल्क
- दुचाकी : ₹20
- चारचाकी वाहन : ₹50
- कॅमेरा : ₹200
उपवनरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, "मसाई पठार हे जैविविधतेने समृद्ध असल्याने ते संवर्धन राखीव क्षेत्रात येते. या नैसर्गिक ठेव्याचे जतन करण्यासाठी शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे."
हे ही वाचा : Kolhapur Dasara: कोल्हापूरचा दसरा आणखी रॉयल होणार! राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने केली मोठी घोषणा
हे ही वाचा : सांगलीचं प्रशासन नंबर वन! सात-बाराच्या त्रासातून सुटका होणार, शेतकऱ्यांचा वेळ अन् पैसा दोन्ही वाचणार