शपथविधी सोहळा सुरू असताना चोरांनी हात साफ केले आहेत. आतापर्यंत १३ जणांनी चोरी झाल्याची तक्रार पोलिसात केलीय. यात सोन्याच्या चेन, रोकड आणि इतर किंमती वस्तूंची चोरी झालीय. यात जवळपास १२.४ लाख रुपयांच्या वस्तू आणि पैसे चोरीला गेले आहेत.
आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्याला ५० हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. यात चित्रपट कलाकार, वरिष्ठ अधिकारी यांच्यासह इतर क्षेत्रातले मान्यवर होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांनी चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसात केल्या आहेत. आतापर्यंत १३ एफआयआर नोंद झाले आहेत. शपथविधी सोहळ्याला असलेल्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला.
advertisement
शपथविधी सोहळा झाल्यानंतर बाहेर पडताना गेटवर मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी गोंधळात चोरट्यांनी संधी साधली. कुणाची तीन तोळ्याची चेन तर कुणाचे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवले आहेत. याशिवाय काहींनी हजारो रुपयांची रोकड चोरी झाल्याची तक्रार दाखल केलीय.