मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस साकोलीहून गोंदियाकडे जात होती. यावेळी गोंदियाहून साकोलीकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने या एसटी बसला जोरदार धडक दिली. हा अपघात तुमसर रोड एमआयडीसीजवळ घडला. ही धडक इतकी जोरदार होती की, एसटी बस आणि डंपरच्या पुढील भागाचे मोठं नुकसान झालं आहे.
या अपघातात एसटी बसचा चालक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमी बसचालकाला बाहेर काढण्यात आले आणि त्याला उपचारासाठी तातडीने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, बसमधील ३० प्रवाशांना किरकोळ दुखापती वगळता कोणताही गंभीर इजा झाली नाही.
advertisement
अपघातामुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती आणि दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक पूर्ववत केली.