TRENDING:

गोंदिया : लोकेश यादव यांच्यावर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, चौघेजण ताब्यात

Last Updated:

माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी सपाटे, गोंदिया : गोंदिया येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. यात दोघे नागपूरचे आणि दोघे गोंदियाचे आहेत. तर इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चौघांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
News18
News18
advertisement

माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबारात त्यांच्या कमरेला उजव्या बाजूला गोळी लागली होती. गोळीबारात जखमी झालेल्या लोकेश यादव यांना नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येसाठी मदत केली नाही म्हणून गोळीबार, तपासात समोर आली माहिती

advertisement

लोकेश यादव यांच्यावर गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या यादव चौक या ठिकाणी गोळीबार झाला होता. गोळीबारात जखमी झाल्यानंतर लोकेश यादव यांना उपचारासाठी शासकीय महाविद्यालयात दाखल केलं होतं. मात्र गंभीर जखमी असल्याने नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. गोळीबाराच्या घटनेनंतर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांनी रुग्णालय आवारात मोठी गर्दी केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

लोकेश यादव यांच्यावर तीन अज्ञातांनी हेमू कॉनलीजवळ गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. लोकेश यादव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांचे भाऊ आहेत. त्यांच्यावर गोळीबाराच्या घटनेनंतर गोंदियातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
गोंदिया : लोकेश यादव यांच्यावर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, चौघेजण ताब्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल