Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येसाठी मदत केली नाही म्हणून गोळीबार, तपासात समोर आली माहिती
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शरद मोहोळची हत्या करण्यासाठी मदत करायला नकार देणाऱ्यावर आरोपींनी गोळीबार केला होता अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
पुणे : शरद मोहोळ याची ५ जानेवारीला भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे यांच्यासह ८ जणांना अटक करण्यात आलीय. त्यात २ वकिलांचाही समावेश आहे. दरम्यान, हत्या करण्याआधी तीन आठवड्यांपूर्वी आरोपींनी आणखी एकावर गोळीबार केला होता अशी माहिती आता समोर येतेय. शरद मोहोळची हत्या करण्यासाठी मदत करायला नकार देणाऱ्यावर आरोपींनी गोळीबार केला होता.
भूगाव परिसरात करण्यात आलेल्या या गोळीबार प्रकरणी आता बंडगार्डन पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नामदेव कानगुडे आणि मुन्ना पोळेकर या दोघांनी शरद मोहोळच्या हत्येसाठी एकाला बोलावून घेतले होते. अजय सुतार असं त्याचं नाव असून तो १७ डिसेंबर रोजी नामदेव कानगुडेला भेटला. भूगाव इथं त्याला शरद मोहोळची हत्या करणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यासाठी तू मदत कर असंही सांगितलं. पण अजय सुतारने नकार दिला.
advertisement
अजय सुतारने नकार दिल्यानं त्यावेळी आरोपींसोबत वादही झाला. त्यावेळी अजयने तिथून पळून जायचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी साहिल पोळेकर याने गोळीबार केला. दोन गोळ्या पोळेकरने अजयवर झाडल्या. त्यापैकी एक गोळी अजयच्या पायाला लागली.
गोळीबार केल्यानंतर जखमी झालेल्या अजय सुतारला आरोपींनीच रुग्णालयात नेलं. त्यानंतर याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी दिल्याने अजयने गोळीबाराबद्दल कुणालाही सांगितले नाही. शरद मोहोळच्या खुनानंतर आरोपींनी आधीही गोळीबार केल्याचं समोर आलं होतं. त्याचा अधिक तपास केल्यानंतर ही माहिती समोर आली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2024 9:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येसाठी मदत केली नाही म्हणून गोळीबार, तपासात समोर आली माहिती









