आता सर्व भक्तांना कसं मिळणार दर्शन?
बाळूमामांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यासाठी आणि सर्व भाविकांना समान वागणूक मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणालाही विशेष वागणूक दिली जाणार नाही. सर्व भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागेल.
आता बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना तीन पर्यायांचा वापर करावा लागेल. दर्शन मंडपातून सुरू होणाऱ्या रांगेतून भाविकांना बाळूमामांच्या समाधीचे आणि चांदीच्या पादुकांचे दर्शन घेता येईल. मंदिराच्या पूर्व बाजूने मुखदर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे. मुखदर्शनासोबतच पायरी दर्शनाचीही व्यवस्था आहे.
advertisement
या दोन्ही बाजूला भंडारा लावण्यासाठी आणि श्रीफळ-प्रसाद अर्पण करण्यासाठी स्वतंत्र सोय आहे. देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष शामराव होडगे आणि सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी सांगितले की, भाविकांना सोपे आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे यासाठी आणखी नवीन योजना आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बाळूमामांचे पुतळे ठेवण्यास बंदी
देवस्थान समितीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आदमापूर परिसरात काही दुकानांसमोर बाळूमामांचे पुतळे ठेवले जातात. यामुळे बाळूमामांच्या प्रतिमेला बाधा पोहोचू शकते. म्हणून, बाळूमामांच्या प्रतिमेचे पावित्र्य जपण्यासाठी अशाप्रकारे पुतळे ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
हे ही वाचा : Do You Know : आकाश नेहमी निळा का दिसतो? गुलाबी किंवा लालसर का नाही दिसत? यामागचं सायन्स तुम्हाला आश्चर्यचकीत करेल
हे ही वाचा : Weather Alert: ताशी 40 किमीने वारे वाहणार, मराठवाड्यात धो धो कोसळणार, छ. संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना अलर्ट