Weather Alert: ताशी 40 किमीने वारे वाहणार, मराठवाड्यात धो धो कोसळणार, छ. संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: सप्टेंबरच्या सुरुवातीलाच मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 24 तासांसाठी छत्रपती संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचे प्रमाण वाढले आहे. आज 3 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठवाड्यात मंगळवारी काही भागात जोरदार पाऊस झाला. आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.

3/5
मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

4/5
लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यात सामान्यतः ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मध्यम पाऊस असण्याची शक्यता आहे. कन्नड तालुक्यातील चापानेर धरण सद्य स्थितीला ओव्हारफ्लो झाले.

5/5
दरम्यान, पुढील 24 तासानंतर हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता असून पावसाचा जोर ओसरणार आहे. गुरुवारी छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता इतर जिल्ह्यांना कोणतही सतर्कतेचा अलर्ट नसेल. मात्र, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement