Do You Know : आकाश नेहमी निळा का दिसतो? गुलाबी किंवा लालसर का नाही दिसत? यामागचं सायन्स तुम्हाला आश्चर्यचकीत करेल

Last Updated:

लहानपणी आपल्याला असे प्रश्न पडायचे, पण जसजसे आपण मोठे होते, तेव्हा आयुष्यातील इतर गोष्टींमुळे आपण याबद्दल विचार करणंच सोडून दिलं आहे. पण आता पुन्हा आम्ही तुमच्यामध्ये ती उत्सुकता वाढवली असेल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपण दररोज आकाशाकडे पाहतो, आपल्याला ते निळ दिसतं आणि त्यामध्ये पांढरे ढग असतात. तर रात्रीच्या वेळी तो काळा दिसतो. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की आकाश हा आपल्याला नेहमी निळा का दिसतो? ते हिरवं, गुलाबी किंवा लालसर का नाही?
लहानपणी आपल्याला असे प्रश्न पडायचे, पण जसजसे आपण मोठे होते, तेव्हा आयुष्यातील इतर गोष्टींमुळे आपण याबद्दल विचार करणंच सोडून दिलं आहे. पण आता पुन्हा आम्ही तुमच्यामध्ये ती उत्सुकता वाढवली असेल.
आकाश निळं दिसतं त्यामागचं कारण
आकाशाचा रंग हा प्रत्यक्षात सूर्यप्रकाश आणि पृथ्वीच्या वातावरणातील एक अद्भुत खेळ आहे. आपल्याला सूर्यप्रकाश पांढरा दिसतो, पण त्यात इंद्रधनुष्यातील लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, इंडिगो आणि जांभळा असे सात रंग मिसळलेले असतात. जेव्हा हा पांढरा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो, तेव्हा हवा आणि त्यातील नायट्रोजन-ऑक्सिजनच्या सूक्ष्म अणूंवर आदळतो आणि इथूनच रंगांची जादू सुरू होते.
advertisement
सूर्यप्रकाश कसा पसरतो?
सूर्यप्रकाशातील प्रत्येक रंगाची तरंगलांबी वेगवेगळी असते. निळा आणि जांभळा रंगाची तरंगलांबी खूप लहान असते, तर लाल आणि नारंगी रंगाची तुलनेने मोठी असते. जेव्हा प्रकाशाचे हे किरण हवेतील अणूंवर आदळतात, तेव्हा रेले प्रकीर्णन (Rayleigh Scattering) नावाची प्रक्रिया घडते. यात लहान तरंग जास्त प्रमाणात पसरतात. म्हणूनच निळा प्रकाश जास्त प्रमाणात पसरतो आणि आपल्याला आकाश निळं दिसतं.
advertisement
मग आकाश जांभळं का दिसत नाही?
जांभळ्या रंगाची तरंगलांबी निळ्यापेक्षाही लहान असते, तरीही आकाश जांभळं दिसत नाही कारण आपल्या डोळ्यांना निळा रंग जास्त स्पष्टपणे दिसतो, तर जांभळा रंग तितका ठळक दिसत नाही. त्यातच, सूर्य निळ्या प्रकाशाच्या तुलनेत जांभळा प्रकाश खूप कमी उत्सर्जित करतो. त्यामुळे आपल्याला आकाश प्रामुख्याने निळं दिसतं.
सकाळी आणि संध्याकाळी आकाश लालसर का दिसतं?
जेव्हा सूर्य उगवतो किंवा मावळतो, तेव्हा त्याचा प्रकाश वातावरणातून अधिक अंतर कापतो. या वेळी निळ्या आणि जांभळ्या तरंगा आधीच पसरून जातात आणि आपल्या डोळ्यांपर्यंत लाल आणि नारंगी रंग उरतात. त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाश लालसर, सोनसळी किंवा गुलाबीसर दिसतं.
advertisement
दररोज सकाळ-संध्याकाळ आकाश आपल्या समोर एक नवीन चित्र उभं करतं. कधी निळं, कधी गुलाबी, तर कधी सोनसळी. हे फक्त पाहण्यासाठीच नाही, तर निसर्ग आणि विज्ञानाच्या अद्भुत संगमाची ओळख करून देण्यासाठी देखील आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Do You Know : आकाश नेहमी निळा का दिसतो? गुलाबी किंवा लालसर का नाही दिसत? यामागचं सायन्स तुम्हाला आश्चर्यचकीत करेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement