वेळेत झालेली अविश्वसनीय बचत
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली महसूल विभागाने ही किमया साधली आहे. आकडेवारी पाहिल्यास हा बदल किती मोठा आहे, हे लक्षात येते...
- वारसा हक्काच्या नोंदी : पूर्वी या कामासाठी सरासरी 191 दिवस लागत होते, आता हेच काम फक्त 88 दिवसांत पूर्ण होत आहे. म्हणजेच, शेतकऱ्यांच्या वेळेची तब्बल 103 दिवसांची बचत होत आहे.
- खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदी : जमिनीच्या खरेदी-विक्रीनंतर होणाऱ्या फेरफार नोंदीसाठी पूर्वी 164 दिवस लागायचे, आता तो कालावधी 92 दिवसांवर आला आहे.
- अनोंदणीकृत फेरफार निकाली काढण्यासाठी 25 ऐवजी 22 दिवस, तर नोंदणीकृत दस्तांवरील फेरफार 34 ऐवजी 28 पूर्ण होत आहे.
advertisement
ही वेगवान कार्यप्रणाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा एक भाग आहे. यामुळे शेतकऱ्यांचा केवळ वेळच नाही, तर पैसा आणि मानसिक त्रासही वाचत आहे.
प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक
या यशस्वी मोहिमेमुळे महसूल विभागाची प्रतिमा उंचावली असून, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले की, "अपर मुख्य सचिव आणि विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे यश मिळवले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा प्रभावी उपाययोजना भविष्यातही सुरूच राहतील." या मोहिमेच्या यशामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा : Kolhapur Dasara: कोल्हापूरचा दसरा आणखी रॉयल होणार! राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने केली मोठी घोषणा
हे ही वाचा : Kolhapur Crime : 'घरासमोर का शिंकला?', म्हणत शेजाऱ्यांवर विळ्याने वार, नवरा-बायकोवर गुन्हा, कोल्हापूरात खळबळ!