Kolhapur Crime : 'घरासमोर का शिंकला?', म्हणत शेजाऱ्यांवर विळ्याने वार, नवरा-बायकोवर गुन्हा, कोल्हापूरात खळबळ!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur Crime : 'माझ्या घरासमोर का शिंकला', असा अजब प्रश्न विचारून नवरा-बायकोने शेजाऱ्यावर विळ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर...
Kolhapur Crime : 'माझ्या घरासमोर का शिंकला', असा अजब प्रश्न विचारून नवरा-बायकोने शेजाऱ्यावर विळ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली (ता. करवीर) येथे घडली आहे. या हल्ल्यात राजाराम माने (वय-50) आणि रविराज माने (वय-25) हे दोघे जखमी झाले आहेत.
बुधवारी (दि. 10) सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही घटना विंचवाचा माळ परिसरात घडली. फिर्यादी अजय बाबूराव माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आई घराबाहेर उभी असताना शिंकली. ही गोष्ट समोरच्या घरात राहणाऱ्या नारायण कृष्णात माने यांना आवडली नाही. 'माझ्या घरासमोर का शिंकला?' असा जाब विचारत त्यांनी विळा घेऊन अजय यांच्या आईवर धाव घेतली.
advertisement
त्यावेळी, अजय यांचे काका राजाराम माने आणि भाऊ रविराज माने मध्यस्थी करायला गेले. मात्र, नारायण माने आणि त्यांची पत्नी संगीता माने यांनी या दोघांवरही विळ्याने हल्ला केला. तसेच त्यांना मारहाणही केली. या घटनेनंतर अजय माने यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी नारायण आणि संगीता माने या दांपत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
हे ही वाचा : 77 तोळं सोनं, अडीच लाखांची रोकड, कोट्यवधींची मालमत्ता! बंडू आंदेकरच्या घरावर छापा, काय काय सापडलं?
हे ही वाचा : सांगली-कोल्हापुरातही घर घेण्याची सुवर्णसंधी! म्हाडाच्या 4186 घरांसाठी लॉटरी, अर्ज नोंदणी सुरू, वाचा सविस्तर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 10:05 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Kolhapur Crime : 'घरासमोर का शिंकला?', म्हणत शेजाऱ्यांवर विळ्याने वार, नवरा-बायकोवर गुन्हा, कोल्हापूरात खळबळ!