सांगली-कोल्हापुरातही घर घेण्याची सुवर्णसंधी! म्हाडाच्या 4186 घरांसाठी लॉटरी, अर्ज नोंदणी सुरू, वाचा सविस्तर
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
MHADA Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाने पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए आणि सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील 4186 घरांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीचा...
MHADA Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाने पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए आणि सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील 4,186 घरांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीचा ‘गो-लाईव्ह’ कार्यक्रम पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पार पडला.
या घरांची सोडत 21 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. इच्छुकांना 11 सप्टेंबर पासून अर्ज करता येत असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे. अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदतही 31 ऑक्टोबर आहे. ज्यांना ऑनलाईन भरणा शक्य नाही, ते 1 नोव्हेंबर पर्यंत बँकेत चलन भरू शकतात.
अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक
- 11 नोव्हेंबर रोजी अर्जांची पहिली यादी (प्रारूप यादी) प्रसिद्ध होईल.
- 13 नोव्हेंबर रोजी या यादीवर हरकती (आक्षेप) नोंदवता येतील.
- 17 नोव्हेंबर रोजी सोडतीसाठी पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर होईल.
advertisement
या सोडतीत खालीलप्रमाणे विविध गृहनिर्माण योजनांमधील घरांचा समावेश आहे
- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना : 1683 घरे
- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : 299 घरे
- 15% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत) : 864 घरे
- 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत) : 3222 घरे
advertisement
हे ही वाचा : Indian Railway : तुम्हाला सारखाच वाटतो, पण ट्रेनचे 11 प्रकारचे हॉर्न, समजून घ्या प्रत्येकाचा अर्थ
हे ही वाचा : रोजचा प्रवास गोड झाला! रिक्षाचालक काकांना दिलं अनोखं सरप्राईज, शाळकरी मुलींचा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'व्वा'!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सांगली-कोल्हापुरातही घर घेण्याची सुवर्णसंधी! म्हाडाच्या 4186 घरांसाठी लॉटरी, अर्ज नोंदणी सुरू, वाचा सविस्तर