कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावरील गाडी
कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर 01209/01210 या क्रमांकाने 29 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात आठवड्यातील सहा (शुक्रवार वगळता) धावणार आहे. 6 वाजून 10 मिनिटांना सुटणारी ही गाडी कलबुर्गी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांना पोहोचणार आहे. त्याचबरोबर दररोज सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी कलबुर्गीतून सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूरात पोहोचणार आहे.
advertisement
कोल्हापूर-कटिहार मार्गावरील गाडी
कोल्हापूर-कटिहार मार्गावर 01405/01406 या क्रमांकाची गाडी 14 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत साप्ताहित स्पशेल म्हणून धावणार आहे. तर रविवारी सकाळी 9.36 वाजता कोल्हापूरातून सुटणारी ही रेल्वे बिहारच्या कटिहारमध्ये मंगळवारी सकाळी 6.10 मिनिटांनी पोहोचणार आहे. पुन्हा कटिहारमधून मंगळावारी सायंकळी 6.10 वाजून सुटणार असून गुरुवारी दुपारी 3.35 मिनिटांनी कोल्हापूरात पोहोचणार आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावरील गाडी
कोल्हापूर-मुंबई मार्गावर 01417/01418 या क्रमांकाची गाडी 24 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या काळात साप्ताहिक स्पेशल म्हणून धावणार आहे. दर बुधवारी रात्री 10 वाजता कोल्हापूरातून ही गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता मुंबईत पोहोचणार आहे. पुन्हा दर गुरूवारी अडीच वाजता मुंबईतून सुटणारी ही गाडी दर शुक्रवारी पहाटे 4.20 वाजता कोल्हापूरात पोहोचणार आहे.
हे ही वाचा : Special Train: उत्तरेतील प्रवाशांना रेल्वेचे मोठे गिफ्ट, जालन्यातून धावणार विशेष रेल्वे गाडी, पाहा वेळापत्रक
हे ही वाचा : Kolhapur News: वाहतूक कोंडीत कोल्हापूरकरांचा 'श्वास' गुदमरतोय; उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष देतील का?