सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराईमधील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरातील कला केंद्रांचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी दररोज नव नवीन माहिती समोर येत आहे. नर्तिका पूजा गायकवाडला गोविंद बर्गे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाडला मात्र कोर्टाने दिलासा दिला आहे. पूजाला बार्शी कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे तिचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, कोर्टाने अटही घातली आहे.
advertisement
गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज सोमवारी संपली होती. तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी तपासाबद्दल माहिती दिली. तसंच अधिकची पोलीस कोठडी मागितली होती. पण बार्शी न्यायालयाने अटी शर्थीवर पूजाला न्यायालयीन कोठडी दिली आहे. बार्शी न्यायालयाने पूजाला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. पण पूजाला कुठेही जाता येणार नाही. तिला पोलीस चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे. पण आता पूजा गायकवाड जामिनासाठी अर्ज करू शकते. त्यामुळे आता पूजा गायकवाड हिची सोलापुरातील महिला कारागृहात करण्यात रवानगी करण्यात आली आहे.
धाराशिवमध्ये 'छमछम'चं साम्राज्य! शेतकऱ्यांच्या लेकरांना नादाला कोण लावतंय?)
पूजा आणि गोविंद एकत्र होते लॉजवर
दरम्यान, पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे हे बीड व वैराग इथं वेगवेगळ्या लॉज आणि इतर ठिकाणी एकत्र राहिल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाहीतर पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या चॅटिंगमध्ये गोविंद बर्गे याने आत्महत्याची धमकी दिली होती. हे ही समोर आलं आहे. याआधीच पोलिसांनी बर्गे यांनी पूजाला ७ लाखांचा पावणे दोन गुंठे प्लॉट विकत घेऊन दिल्याचं समोर आलं होतं. पण आता पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी पूजा गायकवाड हिच्यासोबत काम करणाऱ्या अनेक नागरिक आणि तिच्या मैत्रिणींचा पोलिसांनी जबाब घेतला.
नेमकं काय आहे प्रकरण?
गोविंद कला केंद्रात (Kala Kendra Dancer) पूजा गायकवाड नावाची ही नर्तिक आहे. गोविंद बर्गे हे तिचा डान्स पाहण्यासाठी कला केंद्रात गेले आणि तिच्या प्रेमात पडले. हा प्रेमाचा खेळ दीड वर्ष सुरू होता. पण, जसे जसे पूजाच्या जाळ्यात गोविंद अडकत गेले, तशा त्यांच्या अडचणी वाढल्या. पूजाने गोविंद यांच्याकडे सोनं, मोबाईल असे अनेक गिफ्ट मागितले. प्रेमापोटी गोविंद यांनी तिला सोनं आणि चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा आयफोन मोबाईलही दिला होता. पण पूजाचा आता गोविंदच्या घरावर डोळा होता. तिने बर्गे यांचं गेवराईमधील राहतं घर आपल्या नावावर करून देण्यासाठी तगादा लावला. यातून दोघांमध्ये वाद झाला. गोविंदने हे करायला नकार दिला. त्यामुळे पूजाने त्याच्याशी बोलणं बंद केलं. एवढंच नाहीतर तिने गोविंदला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली होती.
पूजाने धमकी दिल्यामुळे गोविंद हे उद्गिग्न झाले होते. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्कात नसल्यामुळे गोविंद हे ९ सप्टेंबर २०२५ रोजी पुजाच्या घरासमोर आले होते. नर्तिकाच्या घरासमोरच गाडीमध्ये ड्रायव्हर सीटला बसून पिस्तूल मधून गोळी गोविंदने उजव्या कपाळातून डाव्या बाजूला फायर करून घेतली. यात गोविंदा जागीच मृत्यू झाला. अखेरीस गोविंद बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोविंद हा विवाहित होता त्याला एक नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा होता.