अशा अनेक पूजा जाळं टाकून आहे 'गोविंद'साठी, धाराशिवमध्ये 'छमछम'चं साम्राज्य! शेतकऱ्यांच्या लेकरांना नादाला कोण लावतंय?
- Published by:Sachin S
- Reported by:BALAJI NIRFAL
Last Updated:
एकट्या धाराशिवमध्ये १० ते १५ कला केंद्रांनी बस्तान मांडलं आहे. अशाच एका कला केंद्राच्या दारात जाऊन गोविंद बर्गे नावाच्या सरपंचाने मागील आठवड्यात आत्महत्या केली.
धाराशिव : 90 च्या काळामध्ये मुंबई डान्सबारने थैमान घातलं होतं. गल्लीबोळात डान्सबारचा सुळसुळाट झाला होता. या डान्सबारवर नेहमी नोकरदार, श्रीमंताची पोरं, धनदांडगे यांची गर्दी असायचे. एवढंच नाहीतर गुजरातहून अनेक छोटेमोठे उद्योजक शनिवारी गर्दी करायचे आणि 'छमछम'वर पैशांची उधळपट्टी करायचे. या 'छमछम'च्या दुनियेमुळे अनेक कुटुंब बर्बाद झाली. नंतर सरकारने ही डान्सबाद संस्कृती बंद पाडली. पण, आता मुंबईला लाजवेल असे छमछमचे प्रकार मराठवाड्यात पसरले आले. धाराशिव, बीड आणि सोलापूरच्या पट्यात कला केंद्रांनी उच्छाद मांडला आहे. एकट्या धाराशिवमध्ये १० ते १५ कला केंद्रांनी बस्तान मांडलं आहे. अशाच एका कला केंद्राच्या दारात जाऊन गोविंद बर्गे नावाच्या सरपंचाने मागील आठवड्यात आत्महत्या केली.
माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील तुळजाई कला केंद्र स्थानी या कलाकेंद्रांची प्रकरणे ऐरणीवर आली आहे. धाराशिव माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी लोकनाट्यकला केंद्रावरील नर्तकी पूजा गायकवाडच्या नावामुळे वाशी तालुक्यातील पिंपळगाव (क.) येथील तुळजाई सांस्कृतिक लोककलानाट्य केंद्र राज्यात चर्चेत आले आहे. या लोकनाट्य केंद्रावर वाशी पोलिसांनी केलेल्या तपासणीत अनेक गैरमार्ग आणि अनियमितता समोर आली होती.
advertisement
या अहवालावरून वाशी तहसीलदारांनी या लोककला नाट्य केंद्राचा परवाना रद्द केला होता. परंतु, या परवाना निलंबनाच्या आदेशास अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्थगिती देत पुन्हा अहवाल मागविला. या संपूर्ण प्रकरामुळे निलंबनास स्थगिती देण्याचा निर्णय संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून पोलिसांचा स्वयंस्पष्ट नियमभंग करणारा अहवाल असूनही पुन्हा नव्याने तपासणीतून नेमके काय साध्य केले जातेय याबाबत चर्चा होत आहे.
advertisement
दरम्यान, याच कलाकेंद्राला पिंपळगाव येथील येथील महिलांनी देखील विरोध केला असून त्यांनी प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या आहेत मात्र प्रशासन कुठलीच कार्यवाही करत नसल्याने या महिला देखील संतप्त झाले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील सगळीच कला केंद्र बंद करा, अशी मागणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात एकूणच हे कला केंद्राचे लोन वाढले असून यातून गोळीबार तसंच हाणामारी सारख्या घटना सातत्याने घडत आहेत. ज्या तुळजाई कला केंद्रावर हा सगळा प्रकार घडला, त्यात तुळजाई कला केंद्रावर जाऊन नेमकी प्रकरणाची वस्तू तिथी आणि धाराशिव जिल्ह्यात कला केंद्राच्या वाढत चाललेल्या प्रस्ताबद्दल आमचे धाराशिव चे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी आढावा घेतला आहे.
advertisement
गोविंद बर्गे आत्महत्या आणि पूजा गायकवाडबद्दल कला केंद्र काय म्हणालं?
गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाडची ओळख ही तुळजाई कला केंद्रावर झाली होती. आमच्या प्रतिनिधीने जेव्हा कला केंद्राच्या व्यवस्थापकांशी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्याचं टाळलं. या प्रकरणाशी आमचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुळात तुळजाई कला केंद्राचा परवाना हा तहसिलदारांनी पोलिसांच्या अहवालावर रद्द केला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यामुळे एकीकडे स्थानिक तहसिलदारांनी जर परवाना रद्द केला असेल तर जिल्हा प्रशासनाने परवानगी कशी दिली, याबद्दल बराच वाद आहे.
advertisement
कला केंद्रामुळे अनेक कुटुंब झाले उद्धध्वस्त!
विशेष म्हणजे, बीड, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये पवनचक्की कंपन्यांची एंट्री झाली आहे. पवनचक्की कंपन्यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला मोबदला दिला आहे. त्यामुळे या भागातील बरेच धनदांडगे हे या कला केंद्राच्या दारी पोहोचले आहे. या कला केंद्रावर तरुण मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या भागातले तरुण आणि विवाहित तरुण इथं कायम येत असतात. हेच तरुण इथं नाचणाऱ्या तरुणींवर पैसे उधळपट्टी करत असतात. त्यामुळे अनेक कुटुंब या कला केंद्राच्या नादामुळे उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे हे बंद झाले पाहिजे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
advertisement
लाडके मेव्हणे झाले बरबाद
विशेष म्हणजे, या भागातील अनेक महिलांनी कला केंद्राबद्दल तक्रार केली होती. तरुण पिढी उद्धवस्त व्हायला लागली. लाडकी बहिणी म्हणतात पण लाडके मेव्हणे मात्र या कला केंद्राच्या नादी लागून बरर्बाद झाले आहे. मग लाडक्या बहिणीचा काय फायदा आहे. तुळजाभवनी कला केंद्राबद्दल आम्ही तक्रार केली होती. पण, जिल्हा प्रशासनाकडून हात वर करण्यात आले. आम्ही हे बंद करू शकत नाही, अशी उत्तर दिली होती. तहसिलदारांनी मध्यंतरी या कला केंद्राचा परवाना रद्द केला होता. पण ९ दिवसानंतर पुन्हा हे कला केंद्र सुरू झालं. मग याची कोण पाठराखण करत आहे? असा सवाल स्थानिक महिला उपस्थितीत करत आहे.
advertisement
तसंच, "आता पूजा गायकवाड या नर्तिकेमुळे गोविंद बर्गे तरुणाने आत्महत्या केली. बर्गे कुटुंबांची अवस्था ही पिंजरा सिनेमा सारखी झाली आहे. तिने टार्गेटकरून सगळे पैसे आणि संपत्ती लाटली. या कला केंद्रामुळे २० ते ३० गावांना त्रास आहे. त्यामुळे असे कला केंद्र बंद झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
September 15, 2025 7:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशा अनेक पूजा जाळं टाकून आहे 'गोविंद'साठी, धाराशिवमध्ये 'छमछम'चं साम्राज्य! शेतकऱ्यांच्या लेकरांना नादाला कोण लावतंय?