पाकिस्तानला 24 तासात दुसरा धक्का, Asia Cup मध्ये मोठा उलटफेर, उरलीसुरली अब्रूही जाणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. रविवारी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव केला.
दुबई : आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. रविवारी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव केला, याचसोबत टीम इंडियाने एक सामना शिल्लक असतानाच आशिया कपच्या सुपर-4 मध्ये धडक दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तानला मात्र 24 तासांच्या आतमध्येच दुसरा धक्का लागला आहे, त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याची झोप उडाली आहे.
आशिया कपमध्ये सोमवारी ओमान आणि युएई यांच्यामध्ये मॅच झाली. या सामन्यामध्ये युएईने ओमानचा 42 रननी पराभव केला आहे. याचसोबतच युएईने पॉईंट्स टेबलमध्ये त्यांचं खातं उघडलं आहे. ग्रुप ए मध्ये आता टीम इंडिया 4 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान आणि युएईचे 2-2 पॉईंट्स आहेत. चांगल्या नेट रनरेटमुळे पाकिस्तान दुसऱ्या आणि युएई तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ओमानचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
advertisement
पाकिस्तानचं टेन्शन वाढलं
आधी भारताविरुद्धचा पराभव आणि आता युएईचा विजय यामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. 17 सप्टेंबरला पाकिस्तान आणि युएईमध्ये होणारा सामना सुपर-4 मध्ये कोणती टीम जाणार, हे ठरवणारा आहे. टीम इंडियाने 2 पैकी 2 सामने जिंकत आधीच सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. आता ग्रुप ए मधून पाकिस्तान सुपर-4 ला जाणार का युएई, हे 17 तारखेलाच ठरणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर युएई सुपर-4 मध्ये प्रवेश करणारी ग्रुप ए मधली दुसरी टीम ठरेल.
advertisement
पाकिस्तानची धमकी
रविवारच्या सामन्यात टॉसवेळी आणि मॅच संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. यानंतर पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने भारतीय खेळाडू आणि मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांची आयसीसीकडे तक्रार केली. तसंच युएईविरुद्धच्या सामन्यात पायक्रॉफ्टच मॅच रेफरी असतील, तर आम्ही सामना खेळणार नाही, अशी धमकीही पाकिस्तानने दिली आहे. या सामन्यात जर पायक्रॉफ्टच मॅच रेफरी राहिले आणि पाकिस्तानने मॅच खेळायला नकार दिला, तर मॅचचे दोन्ही पॉईंट्स युएईला मिळतील, त्यामुळे पाकिस्तानचं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 9:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पाकिस्तानला 24 तासात दुसरा धक्का, Asia Cup मध्ये मोठा उलटफेर, उरलीसुरली अब्रूही जाणार!