OTT Psychological Thriller: 13 वर्षांचा मुलगा अन् खूनाचा आरोप; 4 एपिसोडची सीरीज, सस्पेन्स पाहून डोकं चक्रावून जाईल

Last Updated:
OTT Psychological Thriller: कधी विचार केलाय का, जर एखाद्या 13 वर्षांच्या निष्पाप दिसणाऱ्या मुलावर त्याच्या वर्गमित्राच्या खुनाचा आरोप झाला तर काय होईल? अशा एका धक्कादायक गोष्टीवर आधारित वेब सीरिज OTT प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे.
1/7
कधी विचार केलाय का, जर एखाद्या 13 वर्षांच्या निष्पाप दिसणाऱ्या मुलावर त्याच्या वर्गमित्राच्या खुनाचा आरोप झाला तर काय होईल? अशा एका धक्कादायक गोष्टीवर आधारित वेब सीरिज OTT प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे.

advertisement
2/7
या मिनी सीरिजमध्ये फक्त 4 भाग आहेत, पण प्रत्येक भाग इतका थरारक आहे की तुम्ही स्क्रीनवरून नजर हटवू शकणार नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडते.

3/7
केवळ खून प्रकरणच नाही तर यातून सोशल मीडियाचा दबाव, सायबर बुलींग, किशोरवयीन मुलांमधील हिंसा आणि विषारी पुरुषत्व यांसारखे गंभीर विषयही उलगडले आहेत.

4/7
या 4 एपिसोडच्या सीरीजचं नाव आहे, Adolescence'. ही या वर्षीची सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सीरिज ठरली आहे. केवळ प्रेक्षकांचं नव्हे तर समीक्षकांचंही मन जिंकून या मालिकेने 6 एमी पुरस्कार आपल्या नावावर केले.

5/7
यामध्ये सर्वात मोठं नावं ठरलं ते 15 वर्षीय ओवेन कूपरचं, ज्याने जेम्स मिलरची भूमिका साकारली आहे. एवढ्या कमी वयात एमी मिळवणारा तो सर्वात तरुण अभिनेता ठरला आहे.

6/7
ही मालिका केवळ थ्रिलर म्हणून नाही, तर एक सामाजिक आरसा म्हणूनही लोकांना भिडते. पालक आणि किशोरवयीन मुलांनी नक्की पाहावी अशी ही सीरिज आहे. तिचं दिग्दर्शन फिलिप बारांटिनी यांनी केलं असून, स्टीफन ग्राहम, अ‍ॅशले वॉल्टर्स, मार्क स्टॅनली आणि क्रिस्टीन ट्रेमार्को यांच्याही दमदार भूमिका आहेत.

7/7
'Adolescence' नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगला उपलब्ध आहे. IMDb वर या मालिकेला 8.1 रेटिंग मिळालं आहे, जे तिच्या यशाची खात्री देतं.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement