बेटीपेक्षा बाप सवाई! पूजा खेडकरच्या वडिलांचं भयानक कृत्य, नवी मुंबई पोलिसांची धक्कादायक माहिती

Last Updated:

Pooja Khedkar: नवी मुंबई पोलिसांकडून तरुणाची सुखरूप सुटक केली असून नुकसानभरपाईच्या वादावरून अपहरण केल्याचे समोर आले आहे.

News18
News18
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबईत घडलेल्या एका अपघातानंतर ट्रक हेल्परच्या अपहरणाने मोठी खळबळ उडाली होती. अपहरण झालेला युवक बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या पुण्यातील बंगल्यात आढळून आला होता. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून अपहरण पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि त्यांचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे यांनी मिळून केल्याची माहिती नवी मुंबई पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे.
advertisement
सरकारी कामात अडथळा आणि आरोपीला पळवून लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दिलीप खेडकर हे फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. दिलीप खेडकर आणि त्यांचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे यांनी मिळून तरुणाचे अपहरण केले. नवी मुंबई पोलिसांकडून तरुणाची सुखरूप सुटक केली असून नुकसानभरपाईच्या वादावरून अपहरण केल्याचे समोर आले आहे.
advertisement

पैसे न दिल्याने खेडकर यांचा पारा चढला

शनिवारी सायंकाळी सुमारे सव्वा सातच्या सुमारास, मुलुंड ते ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझर गाडीमध्ये अपघात झाला.शनिवारी रात्री मिक्सर वाहन घेऊन जाणाऱ्या तरुणाची गाडी आणि खेडकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याने दोघांमध्ये वाद झाला. नुकसानभरपाईचे पैसे न दिल्याने खेडकर यांचा पारा चढला. तरुणाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे सांगत थेट पुण्याच्या घरी नेऊन डांबून ठेवले.
advertisement

गाडीचा मागोवा कसा घेतला? 

डंपर चालकाच्या सहकाऱ्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर रबाळे पोलिसांनी एक पथक गाडीचा मागोवा घेत गेले. कारचा मागोवा घेत MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझरचा शोध घेतला, ती गाडी पुण्यातील बाणेर रस्त्यावरील एका बंगल्याबाहेर उभी असल्याचे निष्पन्न झाले. हा बंगला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा असल्याचे समोर आले.
advertisement

मनोरमा खेडकर याप्रकरणी सहआरोपी

पोलीसांनी घरी येऊन दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. उलट, पोलीसांवर घरातील कुत्रे सोडले, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे . खेडकर यांच्या आईने पोलिसांना तपासात मदत न करता घातली पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना देखील या प्रकरणात सहआरोपी केले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बेटीपेक्षा बाप सवाई! पूजा खेडकरच्या वडिलांचं भयानक कृत्य, नवी मुंबई पोलिसांची धक्कादायक माहिती
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement