Land Cruiser मधून अपहरण, पोलिसांच्याअंगावर कुत्रे सोडले; पूजा खेडकरच्या आई- वडिलांचे खतरनाक कारनामे

Last Updated:

Pooja Khedkar: पोलिसांनी खेडकर यांच्या दारावर नोटीस चिटकवली होती. त्यानंतर ही नोटीस फाडल्याचं समोर आले आहे.

आयएएस पूजा खेडकर
आयएएस पूजा खेडकर
पुणे : बडतर्फ आयएयस अधीकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.पोलिसांनी घराबाहेर चिटकवलेली नोटीस फाडल्याचं समोर आले आहे. रबाळे ड्रायव्हर अपहरण प्रकरणी पोलिसांनी खेडकरच्या घरावर नोटीस लावली होती. रबाळे येथून अपहरण झालेल्या व्यक्तीला पोलिसांनी खेडकरांच्या बाणेरमधील घरातून सुखरुप सोडवलंय. मात्र अपहरणकर्ता आरोपींना लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मनोरमा खेडकरांनी पोलीसांना तपास करण्यासाठी घरात जाऊ दिलं नाही. पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण केला. गुन्ह्यातील कार आणि आरोपींना घेउन पोलिस स्टेशनला येण्याचं मनोरमा खेडकरनं कबुल केलं.मात्र पोलिस स्टेशनमध्ये गेलीच नाही. त्यामुळे पोलिसांनी खेडकर यांच्या दारावर नोटीस चिटकवली होती. त्यानंतर ही नोटीस फाडल्याचं समोर आले आहे.
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे , पुरावा नष्ट करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या वर सरकारी कामात अडथळा आणणे , पुरावा नष्ट करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

advertisement
रबाळे पोलिसांनी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली ऐरोलीमध्ये झालेल्या वाहन अपघातात एका व्यक्तीच अपहरण करून आणून घरात डांबून ठेवल्याप्रकरणी रबाळे पोलिस चौकशी करण्यासाठी आले होते.त्यावेळी आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना सरकारी काम करू दिले नाही. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरकडून पोलीस तपासात अडथळा आणि अपहरणकर्ता आरोपींना लपवण्याचा प्रयत्न या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement

पोलिसांच्या अंगावर सोडले

रबाळे येथून अपहरण झालेल्या व्यक्तीचा तपास करताना, पोलिसांना पुणे, येथील घरामध्येमध्ये आरोपी व गुन्ह्यातील लॅन्डक्रुझर कार (MH 12 RP 5000) असल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले. परंतु घरमालकीण मनोरमा दिलीप खेडकर हिने पोलिसांना घरात प्रवेश नाकारला, गेट बंद करून सरकारी कामात अडथळा आणला, आरोपी आणि गुन्ह्यातले पुरावे (कार) लपवली. एवढच नाही तर कुत्रे सोडून पोलिसांना धमकावले.
advertisement

कारचालक कोण? सस्पेन्स वाढला

आरोपींना लपवण्यासाठी इतकी जोखीम घेतलीय त्याअर्थी अपहरणकर्ते कारचालक कोणी कर्मचारी नव्हे तर कुटुंबियांपैकी पुरूष असणार हे उघड आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Land Cruiser मधून अपहरण, पोलिसांच्याअंगावर कुत्रे सोडले; पूजा खेडकरच्या आई- वडिलांचे खतरनाक कारनामे
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement