Pooja Khedkar : नावे बदलून 12 वेळा UPSC परीक्षा,आरोपावर पूजा खेडकर म्हणाली, “मीच नाही तर मुख्यमंत्र्यांनीही"...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मी शेवटपर्यंत लढणार, मला न्याय मिळणार याची खात्री आहे अशी स्पष्टोक्ती देखील पूजा खेडकरने दिली आहे.
नवी दिल्ली : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरने आपल्यावर झालेले सर्व आरोप चुकीचे असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रान्चसमोर हजर झाली, जवळपास तिची सहा ते सात तास चौकशी झाली. मागील काही दिवसांपासून पूजा खेडकर हिच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. पूजा खेडकरचे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. तसेच मी शेवटपर्यंत लढणार, मला न्याय मिळणार याची खात्री आहे अशी स्पष्टोक्ती देखील पूजा खेडकरने दिली आहे.
पूजा खेडकर म्हणाली, मी तपासात आज पूर्ण सहकार्य केलं. मी कुठलेही बनावट कागदपत्रे सादर केली नाहीत माझी सगळी कागदपत्र खरी आहेत. त्यांनी पुन्हा कधी तपासासाठी यायचं ते सांगितल नाही पण मला जेव्हा बोलवतील तेव्हा मी येणार आहे. सर्टिफिकेटबाबत चुकीची माहिती माध्यमात दिली गेली. मी सगळी बरोबर कागदपत्र सादर केली आहेत. मी देश सोडून दुसऱ्या देशात गेल्याच्या बातम्या होत्या पण मी भारत सोडला नाही. मला न्याय मिळेल असा विश्वास आहे.
advertisement
मी शेवटपर्यंत लढणार आणि मला न्याय मिळणार : पूजा खेडकर
माझे अटेम्पट संपले असा आरोप आहे पण तस काही नाही, मी योग्य वेळेत परीक्षा दिली आहे. 12 डॉक्टरांनी माझ्या दिव्यांग प्रमाणपत्र बाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी शेवटपर्यंत लढणार आणि मला न्याय मिळणार याची खात्री आहे. परीक्षेबाबत मी सगळी प्रोसेस फॉलो केली आहे त्यात कुठलीही गडबड माझ्याकडून झाली नाही, अशी स्पष्टोक्ती पूजा खेडकरने दिली आहे.
advertisement
मी कधीही नाव बदललं नाही : पूजा खेडकर
परीक्षा देताना मी कधीही नाव बदललं नाही, मी फक्त माझ्या आईचं नाव त्यात लावलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या नावात आईच नाव लावले आहे. UPSC कडे सगळी माहिती असते, मी नावात बदल केल्याचे गॅझेट सादर केले आहेत. मला नोकरीतून काढून टाकलं आहे त्याविरोधात मी CAT मध्ये अपील केलं आहे, असे देखील पूजा खेडकर म्हणाली,
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 02, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pooja Khedkar : नावे बदलून 12 वेळा UPSC परीक्षा,आरोपावर पूजा खेडकर म्हणाली, “मीच नाही तर मुख्यमंत्र्यांनीही"...