Mumbai Local : मुंबई लोकलचा कायापालट होणार, कशी असणार डब्ब्यांची संरचना ?

Last Updated:

Mumbai Local Updates : मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलच्या डब्ब्यांचा आता आणखीनच कायापालट होणार आहे. मुंबई लोकल आता लवकरच आणखीनच हायटेक होणार आहे.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलच्या डब्ब्यांचा आता आणखीनच कायापालट होणार आहे. मुंबई लोकल आता लवकरच आणखीनच हायटेक होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून तयार करण्यात येणाऱ्या 12 आणि 15 डब्यांच्या एसी लोकलमधील मालडब्बेही वातानुकूलित असणार आहेत. त्यामुळे मुंबई लोकल आता आणखीनच अपग्रेड होताना दिसत आहे. रेल्वे मार्गांवर सतत होत असलेल्या अपघातानंतर रेल्वे विकास महामंडळाने वातानुकुलित डब्ब्यांचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्टेशन नजीक झालेल्या अपघातापासून मुंबईसह सर्व उपनगरातील लोकल वातानुकुलित होणार अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या प्रोजेक्टच्या दृष्टीने पावलं उचलण्यात येत असल्याचं दिसत आहे. सर्व लोकल एसी झाल्यानंतर माल डब्यांचे काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता मुंबईचे मुख्य घटक असलेल्या मालवाहू कामगारांनाही एसीचा गारेगार प्रवास करता येणार आहे. मालवाहू डब्ब्यांतून अनेक गोष्टींची वाहतूक केली जाते. त्या गोष्टींचा अनेकदा दुर्गंधही येतो.
advertisement
त्याचा दुर्गंध पसरू नये, यासाठी रेल्वेने एसीच्या डब्यात तो वास पसरू नये याचीही काळजी प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र डबा आणि स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा अशी व्यवस्था असणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दोन हजार 856 एसी वंदे मेट्रो डब्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्येच 12 आणि 15 डब्यांच्या लोकल तयार करण्यात येणार असल्याची माहिती ही मिळत आहे. शिवाय, रेल्वे महामंडळ सध्या 18 डब्यांच्या लोकलचीही चाचणी करत आहे. या लोकलसाठी निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
advertisement
नव्याने तयार होणाऱ्या 12 आणि 15 डब्यांच्या एसी लोकलमध्ये मालडब्याची विशेष व्यवस्था असेल. वंदे भारत ट्रेनप्रमाणेच वंदे भारत मेट्रो डब्ब्यांचीही व्यवस्था केली जाणार आहे. नवीन लोकलमध्ये प्रवाशांना एका डब्ब्यातून दुसऱ्या डब्ब्यात जाण्याची सोय मिळणार आहे. मालडब्यासाठी लोकलच्या पुढे आणि मागे स्वतंत्र डबे असणार आहेत. त्यामुळे मालडब्यातील विविध गोष्टींचा वास सर्व ट्रेनमध्ये पसरणार नाही. सध्या लोकलमध्ये असलेल्या डब्यांप्रमाणेच या ट्रेनचीही रचना असण्याची शक्यता आहे. त्या डब्ब्यांमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणार आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : मुंबई लोकलचा कायापालट होणार, कशी असणार डब्ब्यांची संरचना ?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement