Intelligence Bureau Recruitment : इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 455 सरकारी नोकऱ्या! अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता आणि वेतन जाणून घ्या
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Intelligence Bureau Recruitment : केंद्रीय गुप्तचर विभागात तरुणांना नोकरीची संधी आहे. केंद्रीय गुप्तचर विभागात अलीकडेच नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जे तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
केंद्रीय गुप्तचर विभागात तरुणांना नोकरीची संधी आहे. केंद्रीय गुप्तचर विभागात अलीकडेच नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जे तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गुप्तचर विभागाने ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 5 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेली असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा.. इच्छुक उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतील. या ऑनलाइन भरती अंतर्गत एकूण 455 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2025 आहे. या भरती अंतर्गत एकूण 455 पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10वी उत्तीर्ण, वाहन चालक परवाना (LMV) आणि ड्रायव्हिंगचा 01 वर्ष अनुभव असणे अनिवार्य आहे.
advertisement
भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे असणे आवश्यक आहे. वयाची गणना 10 ऑगस्ट 2025 च्या आधारावर केली जाईल. आरक्षित वर्गांना सरकारी नियमांनुसार नुसार कमाल वयमर्यादेत सूट दिली जाईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 5 वर्षांची सूट तर इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात येणार आहे. संपूर्ण भारतातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
Location :
Maharashtra
First Published :
September 15, 2025 8:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Intelligence Bureau Recruitment : इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 455 सरकारी नोकऱ्या! अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता आणि वेतन जाणून घ्या