भारतात सुसज्ज तंत्रज्ञानासह नव्या मेडिकोव्हर हॉस्पिटलची निर्मिती, लवकरच येणार IPO
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या सुपर- स्पेशालिटी हेल्थकेअर नेटवर्कपैकी एक असलेल्या मेडिकोव्हर हॉस्पिटल्सने हैदराबादमध्ये दोन नवीन मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल्सची भर घालून तेलंगणामध्ये महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या आहेत.
भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या सुपर- स्पेशालिटी हेल्थकेअर नेटवर्कपैकी एक असलेल्या मेडिकोव्हर हॉस्पिटल्सने हैदराबादमध्ये दोन नवीन मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल्सची भर घालून तेलंगणामध्ये महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या आहेत. सिकंदराबादमधील नवीन मेडिकोव्हर हॉस्पिटल, जे 100 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीमध्ये आणि 300 बेड्सच्या क्षमतेने विकसित केले गेले आहे. या हॉस्पिटलचं उद्या अर्थात 16 सप्टेंबर 2025 रोजी उद्घाटनासाठी सज्ज आहे. हे मेडिकोव्हरचे भारतातील 24वे रुग्णालय आहे.
दरम्यान, कोकापेट शहरात आणखी एका मेडिकोव्हर हॉस्पिटलचे बांधकाम वेगाने सुरू होणार आहे, ज्याच्या कामाला सुरूवात 2025 वर्षाच्या शेवटी सुरू होण्याची शक्यता आहे. 150 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये बांधले जाणारे हे हॉस्पिटल 500 बेड्सचे असणार आहे. त्यामध्ये एक कॅन्सरसाठी सुद्धा एक स्पेशल वॉर्ड असणार आहे. ज्यामध्ये कर्करोग पेशंटचे युनिट काळजी देखील घेईल. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, हे देशातील मेडिकोव्हरचे 25 वे रुग्णालय असेल. हैदराबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना, मेडिकोव्हर हॉस्पिटल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल कृष्णा म्हणाले की, समूहाने चालू आर्थिक वर्षासाठी 2000 रू कोटींच्या उलाढालीचे लक्ष ठेवले आहे.
advertisement
मेडिकोव्हर हॉस्पिटल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी पुढे सांगितले की, "मेडिकोव्हर 2026 मध्ये त्यांचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) लाँच करण्याची योजना आखत आहे. ज्यातून मिळणारे उत्पन्न रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी निर्देशित केले जाईल, जे सध्या सुमारे 1000 कोटी रू इतके आहे. आमचे लक्ष मेट्रो शहरे आणि टियर-२ शहरांमध्ये आमचे नेटवर्क मजबूत करण्यावर आहे. लहान रुग्णालये खरेदी करण्याची आमची तात्काळ योजना नसली तरी, जर ती आमच्या धोरणाशी जुळली तर आम्ही अशा संधींचा सक्रियपणे विचार करू. तेलुगू राज्यांबाहेरील प्रमुख बाजारपेठांमध्ये, विशेषतः बेंगळुरू आणि पुणे येथेही विस्ताराचा शोध घेतला जात आहे."
advertisement
"हैदराबादमध्ये, आम्ही चंदनगर येथे 150 बेड्सच्या सुविधेची क्षमता असलेले हॉस्पिटल करणार आहे. ज्यामुळे मेडिकोव्हर हॉस्पिटलची एकूण क्षमता संपूर्ण भारतात सुमारे 6400 बेडपर्यंत पोहोचेल", अशी प्रतिक्रिया डॉ. अनिल कृष्णा यांनी दिलीये. उद्योगातील आव्हानांवर प्रकाश टाकताना, त्यांनी नमूद केले की देशभरातील क्लिनिकल इंडस्ट्रीमध्ये आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जागतिक चलनातील चढउतार, दर आणि नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वाढत्या आरोग्य सेवेच्या खर्चामुळेही या क्षेत्रावर दबाव वाढत आहे. आरोग्यसेवेत तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावावर डॉक्टरांनी सांगितले की, "येत्या काही वर्षांत एआय एक परिवर्तनकारी भूमिका बजावेल, ज्यामुळे डॉक्टर रुग्णांना जलद, अधिक अचूक आणि अधिक प्रभावी उपचार देऊ शकतील." रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देत, डॉक्टरांनी यावर भर दिला की मेडिकोव्हर रुग्णालयांमधील क्लिनिकल निर्णय केवळ डॉक्टरच घेतात, मॅनेजमेंटचा कोणताही हस्तक्षेप नसतो. "रुग्णांना फक्त त्यांच्या काळजीसाठी आवश्यक तेवढ्याच सेवा पुरवल्या जातात."
Location :
Maharashtra
First Published :
September 15, 2025 7:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भारतात सुसज्ज तंत्रज्ञानासह नव्या मेडिकोव्हर हॉस्पिटलची निर्मिती, लवकरच येणार IPO