Solapur News : बहिणीचं निधन झालं, सुरेश सगळीकडे फिरला, कुणीचं आलं नाही मदतीला! अखेर जावेद आणि मोहसीनने केले अंत्यसंस्कार!

Last Updated:

सोलापूर शहरातील मल्लिकार्जुन नगर येथे मुस्लिम तरुणाने माणुसकीचे दर्शन घडवले. मृत्यू पावलेल्या बहिणीवर अंत्यसस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने मदतीचा हात देत मुस्लिम तरुण जावेद कोलमपल्ली यांनी भर पावसात हिंदू परंपरेनुसार त्या मुलीवर अंत्यसंस्कार केलं.

+
News18

News18

सोलापूर - सोलापूर शहरातील मल्लिकार्जुन नगर येथे मुस्लिम तरुणाने माणुसकीचे दर्शन घडवले. मृत्यू पावलेल्या बहिणीवर अंत्यसस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने मदतीचा हात देत मुस्लिम तरुण जावेद कोलमपल्ली यांनी भर पावसात हिंदू परंपरेनुसार त्या मुलीवर अंत्यसंस्कार केलं शिवाय भर पावसात अंत्यसंस्कार करत माणुसकी दाखवली.
मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड येथे सुरेश श्रीगणेश राहण्यास आहे.सुरेश यांची बहीण सुरेखा चंद्रचूड ही आजारी होती. शुक्रवारी त्यांचा निधन झाला. पण आर्थिक परिस्थिती नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी सुरेश यांनी आर्थिक मदत मिळावे यासाठी शहरभर फिरत होते. पण कोणीही पुढे आले नाही. शनिवारी दुपारी ही बाब माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांना कळाली. ताबडतोब बाबा मिस्त्रीनी रुग्णसेवक जावेद कोलमपल्ली यांना पाठवले. जावेद यांनी घरी जाऊन पाहिले असता घरच्या परिसरात दुर्गंध पसरलेली होती. घराजवळ जाणे मुश्किल झाले होते. रुग्णसेवत जावेद यांनी सर्व हकीकत बाबा मिस्त्री यांना सांगून रुग्णवाहिका पाठवून देण्यास सांगितले.
advertisement
रुग्णवाहिका चालक कुमार व त्यांचे साथीदार मोहसीन यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार साठी स्मशानभूमी येथे नेण्यात आले. आणि शनिवारी दुपारी चार वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. माझी बहीण सुरेखा ही खूप आजारी होती त्यातच त्याचा मृत्यू झाला पण बहिणीच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून मी खूप ठिकाणी फिरलो पण कोणीही मदत केली नाही. पण जावेद, कुमार आणि मोहसीन हे मला देवदूता सारखा भेटले व माझ्या बहिणीचे अंतिम संस्कार झालं असे मत सुरेश श्रीगणेश यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur News : बहिणीचं निधन झालं, सुरेश सगळीकडे फिरला, कुणीचं आलं नाही मदतीला! अखेर जावेद आणि मोहसीनने केले अंत्यसंस्कार!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement