Kokan Railway : दिवाळीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार, चाकरमान्यांचा सण आणखी द्विगुणीत होणार
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Diwali In Special Trains : दिवाळी सणानिमित्त कोकण रेल्वेवर विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांना सणासुदीच्या काळामध्ये रेल्वेचे तिकिट उपलब्ध होत नाहीत.
अवघ्या काही दिवसांवर शारदीय नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी यांसारखे महत्वाचे सण येऊन ठेपले आहेत. सणासुदीच्या काळात नोकरी आणि व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर राहणारे चाकरमानी आपापल्या गावी जात असतात. परिणामी या काळात वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. विशेषत: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. सणासुदीच्या काळातील रेल्वेचा आणखीन भार कमी होण्यासाठी मध्य रेल्वेने खास दर आठवड्यासाठी ट्रेनचं आयोजन केलं आहे.
दिवाळी सणानिमित्त कोकण रेल्वेवर विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांना सणासुदीच्या काळामध्ये रेल्वेचे तिकिट उपलब्ध होत नाहीत. प्रवाशांची हिच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांच्या सोयीसाठी 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत मडगावमार्गे विशेष गाडी क्र. 01463/ 01464 लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपूरम- लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक विशेष) ही रेल्वे सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
advertisement
लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम- (साप्ताहिक) 01463 क्रमांकाची गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर गुरुवारी दुपारी 04: 00 वा. सुटेल. तिरुवनंतरपुरम येथे दुसऱ्या दिवशी रात्री 10: 45 वा. पोहचेल. तर, तिरुवनंतपूरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस- (साप्ताहिक) 01464 क्रमांकाची गाडी तिरुवनंतपुरम वरून 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत दर शनिवारी दुपारी 04:20 वा. सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी रात्री 01: 00 वा. पोहचेल. ही गाडी थिवी, करमळी आणि मडगाव या स्थानकांवर थांबा घेईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 6:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kokan Railway : दिवाळीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार, चाकरमान्यांचा सण आणखी द्विगुणीत होणार