Kalyan News : 'मराठी बोलाच...' पटेल मार्टने सुधारली चूक, कर्मचाऱ्यांना दिली तंबी

Last Updated:

Kalyan News : 15 ऑक्टोबरपर्यंत दुकानातल्या सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आले पाहिजे. असे नाही झाले तर...

News18
News18
गेल्या दीड वर्षांपासून सुरू झालेला कल्याणमधील मराठी आणि परप्रांतीयांमधील मराठी- हिंदी भाषेचा वाद काही संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. हा वाद आता पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसत आहे. कल्याणमधील पटेल आर मार्टमधील एका महिला कर्मचारीसोबत मराठी बोलण्यावरून वाद झाला आहे.
त्याचं झालं असं, दुकानातील त्या महिला कर्मचारीने ज्येष्ठ माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांना हिंदी भाषेतून उत्तरे दिले. घाणेकर म्हणाले की, तू मराठी का नाही बोलत नाही, यावर महिला कर्मचारीने संतापत जोराने टेबलवर हात आपटून म्हणाली की, मराठी बोलण्याची सक्ती आहे का? मी मराठी नाही बोलणार.
advertisement
कर्मचारी महिला असल्याने घाणेकर यांनी पटेल मार्टच्या मॅनेजरला घडलेली घटना सांगितली. याच दरम्यान मनसेचे कार्यकर्ता देखील दुकानात पोहोचले. माहिती कार्यकर्ते घाणेकर यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार मॅनेजरकडे केल्यानंतर मॅनेजर मनीषा धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. घाणेकर यांनी पटेल मार्टला इशारा दिला आहे, 15 ऑक्टोबरपर्यंत दुकानातल्या सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आले पाहिजे. असे नाही झाले तर मी दुकानाबाहेर उभं राहून येथून खरेदी करू नका, असे आवाहन लोकांना करणार असल्याचे सांगितले. मार्टमधील सर्व कर्मचारी मराठीत बोलणार, असं मॅनेजर मनीषा धस यांनी घाणेकर यांना सांगितले.
advertisement
नेमका प्रकार काय घडला ?
सोमवारी (15 सप्टेंबर) सकाळी ज्येष्ठ माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर कल्याणमधील टिळक चौकातील पटेल आर मार्ट दुकानात वस्तू खरेदीसाठी गेले होते. तेथे वस्तू खरेदी करताना घाणेकर यांनी तेथील एका महिला कर्मचारीला खरेदीच्या वस्तू देण्याची मागणी केली. त्यावेळी तिने घाणेकरांसोबत हिंदीमध्ये संवाद साधला. घाणेकर यांनी तुम्हाला मराठी येत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला. तरूणीला घाणेकर कोण आहेत? याचा परिचय नसल्याने तिने मराठी बोलण्याची सक्ती आहे का? मराठी भाषा नाही आली तर काय फरक पडतो, अशी उलट उत्तरं दिली. तरूणीने घाणेकरांना दुकानातल्या डेस्कवर जोरात हात आपटत उलट प्रत्युत्तर केलं.
advertisement
घाणेकर यांना दुकानामध्ये उत्तर देत असताना त्या महिला कर्मचारीने तरूणीने रागाच्या भरात हात आदळआपट केली. आपण महाराष्ट्रात कधीपासून राहत आहात? असा प्रश्न घाणेकरांनी त्या महिला कर्मचारीला विचारलं. तिने मी गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये राहतेय, असं उत्तर दिले. माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दुकानाची मॅनेजर मनीषा धस यांना घडलेला प्रकार सांगितला. मॅनेजरने धस यांना दुकानातील प्रत्येक कर्मचाऱ्याला मराठी भाषा येईल यादृष्टीने प्रयत्न केले जातील. कामगारांना तशा सूचना केल्या जातील, असे आश्वासन दिले. मॅनेजरने घाणेकर यांना आश्वासन दिल्यामुळे तूर्तास मराठी- हिंदी भाषेचा वाद निवळला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Kalyan News : 'मराठी बोलाच...' पटेल मार्टने सुधारली चूक, कर्मचाऱ्यांना दिली तंबी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement