TRENDING:

Guillain Barre syndrome : लातूरमध्ये खरंच GBS शिरकाव झालाय काय? 'त्या' दोन संशयीत रूग्णांचा अहवाल काय?

Last Updated:

पुणे पाठोपाठ आता लातुरमध्ये जीबीएसचे ( GBS)चे दोन संशयीत रूग्ण सापडले होते. या संशयीत रूग्णांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या संशयीत रूग्णाचा आता मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधून नेमकं काय समोर आलंय? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Guillain-Barre syndrome, Latur: गुइलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने पुण्यात थैमान घातल्यानंतर आता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात शिरकाव करायला सूरूवात केली आहे. त्यामुळे पुणे पाठोपाठ आता लातुरमध्ये जीबीएसचे ( GBS)चे दोन संशयीत रूग्ण सापडले होते. या संशयीत रूग्णांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या संशयीत रूग्णाचा आता मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधून नेमकं काय समोर आलंय? हे जाणून घेऊयात.
guillain barre syndrome
guillain barre syndrome
advertisement

पुणे पाठोपाठ लातूरमध्येही जीबीएसचे ( GBS)चे दोन संशयीत रूग्ण सापडले होते. त्यानंतर या रुग्णांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराखातर दाखल करण्यात आले आहे. तपासणीनंतर एका रुग्णाचा अहवाल हा निगेटिव्ह आलं आहे. तर दुसऱ्या रुग्णाचा अहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे अद्याप तरी एकाही रूग्णाला जीबीएसची लागण झाल्याचे अहवालावरून तरी स्पष्ट होत आहे. मात्र तरी खबरदारी म्हणून लातूरमधील नागरीकांना मोठं आवाहन करण्यात आलं आहे.

advertisement

जुलाब होणे, ताप येणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. स्वच्छ राहणे, पाणी उकळून पिणे महत्वाचे असू न नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.उदय मोहिते पाटील यांनी केलं आहे.

पुण्यात रुग्णसंख्या 111 वर

पुण्यात सध्या 111 रुग्ण आहेत, 80 रुग्ण पाच किमीच्या परिघातील आहेत. 35,000 घरे आणि 94,000 नागरिकाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचणी घेण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांची मदत घेतली जाते आहे. एक मृत्यू झाला तो अद्याप GBS मुळेच झाला याची अजून पुष्टी नाही, असं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आलं.

advertisement

मुख्यमंत्र्यांच्या रुग्णालयांना सूचना

गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. पुणे शहरांतील रुग्णांवर उपचारासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्याची सूचना करण्यात आली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Guillain Barre syndrome : लातूरमध्ये खरंच GBS शिरकाव झालाय काय? 'त्या' दोन संशयीत रूग्णांचा अहवाल काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल