TRENDING:

Heavy Rain In Jalna : मुसळधार पावसाने सोयाबीन- कपाशीला आले कोंब, शेकडो शेतकरी चिंताग्रस्त

Last Updated:

मराठवाड्यात मुसळधार पावसाचे सत्र सुरुच आहे. जालना जिल्ह्यातील नेर, सेवली मंडळात सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मराठवाड्यात मुसळधार पावसाचे सत्र सुरुच आहे. जालना जिल्ह्यातील नेर, सेवली मंडळात सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लोकल १८ ने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जाणून घेऊया...
advertisement

जालना शहरासह जिल्ह्यातील पावसाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कल्याण मध्यम आणि कल्याण गिरीजा हे दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. या प्रकल्पाच्या धरणक्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने गिरीजा आणि कल्याणी नदीला पुर आला आहे. याच पुराच्या पाण्यामुळे नदीकाठी असलेल्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. जालना जिल्ह्यातील दहिफळ येथील सतिश काळे यांची १ एकर कपाशी पावसामुळे अक्षरशः आडवी झाली. मारोती चौधरी यांची सोयबीन गंजी पाण्याखाली गेली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

तर गणपत काळे यांच्या शेतातील केळी पिक पुर्णपणे पाण्याखाली गेले. तर इतरही अन्य शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या पिके वाहून गेली. दरम्यान, या पावसामुळे मानेगाव, दहिफळ, धारा, उमरी, पाथ्रूड साळेगाव, टाकरवन, मोतीगव्हाण, हिवर्डी या गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मायबाप सरकारने तत्काळ पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावे अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा शेतकरी गजानन काळे यांनी सरकारला दिला आहे.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Heavy Rain In Jalna : मुसळधार पावसाने सोयाबीन- कपाशीला आले कोंब, शेकडो शेतकरी चिंताग्रस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल