TRENDING:

आभाळ फाटलं! संसार उद्ध्वस्त झाले, रस्ते बुडाले-गावंच्या गावं पाण्याखाली गेली, महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती?

Last Updated:

महाराष्ट्रातील धाराशिव, बीड, सोलापूर, जालना, लातूर, अहिल्यानगर येथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, NDRFची मदत, शाळांना सुट्टी, शेतीचे मोठे नुकसान.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
एकीकडे नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे, नवरात्राचा दुसरा दिवस जल्लोषात साजरा होत आहे. तर दुसरीकडे जीव वाचवण्यासाठी लोक मदत मागत आहे. महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या दृश्यं आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजवर 20 वर्षांत इतका पाऊस कधीच झाला नाही जेवढा या चार दिवसांत झाला. ढगफुटीसदृश्यं झालेल्या या पावसानं होतं नव्हतं सगळं नेलं. गायी-गुरं, बकऱ्या, अगदी उभं पिकही आणि आपली माणसंही... इतकी भयानक परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे.
News18
News18
advertisement

मागच्या 48 तासांत मुसळधार पावसानं थैमान घातलं. ढगफुटी सदृश्यं झालेल्या पावसानं शेतं पाण्याखाली गेली, रस्ते वाहून गेले, अनेक गावांचा संपर्क तुटला. कुणी आसऱ्यासाठी छतावर गेलं तर कुणी झाडाच्या शेंड्याचा आधार घेतला. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि अखेर मदतीला NDRF चे जवान आले. त्यांनी रेस्क्यू करुन पुरातून बाहेर पडायला मदत केली. पण महाराष्ट्रात आताही तितकीच भीषण परिस्थिती आहे.

advertisement

धाराशिवमध्ये काय स्थिती?

धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मुसळाधार पावसामुळे खैरी नदीला पूर आला. पुरामुळे पंरडा तालुक्यातील शेळगाव गावाला पूर्णपणे पुराच्या पाण्याचा वेढा बसला. पावसामुळे निर्माण झालेल्या या भीषण परिस्थितीची ड्रोन दृश्यं कॅमेऱ्यातून समोर आली. संपूर्ण गावाला पुराचा वेढा पडल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील चांदणी धरणात पाण्याची मोठी आवक होते. यामुळे धरणाच्या दरवाजातून विसर्ग सुरू आहे. यामुळे चांदणी नदीच्या पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या आजूबाजूचा परिसर पाण्यानं वेढला आहे.

advertisement

परंडा तालुक्यातील वडनेर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात मध्यरात्रीपासून अडकलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या (NDRF) जवानांसोबत या बचावकार्यात सहभागी होत या कुटुंबाची सुटका केली. या थरारक बचावकार्यानंतर खासदारांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देत सर्वांचे आभार मानले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडनेर गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील एका घरात पाणी शिरल्याने एकाच कुटुंबातील चार जण रात्री २ वाजेपासून आपल्याच घराच्या छतावर अडकून पडले होते... घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले आणि स्वतः त्यांच्यासोबत बचावकार्यात उतरले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

advertisement

बीडमध्ये काय स्थिती?

बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा परिसरात पुन्हा अतिवृष्टीने जोडप्याने कडी नदीला पूर आला. नदीकाठीची घर आणि शेती पाण्याखाली गेली आहे. या पूर परिस्थिती भयानकता ड्रोनच्या माध्यमातून दिसत आहे. तर उध्वस्त होणारा शेती शेतकरी आणि घर संसार याची भीषणता विचार करायला लावणारी आहे. प्रशासनाने नदीकाठी कोणीही जाऊ नये असे आवाहन केले आहे. आठ दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे कडा शहर आणि परिसरातील सहा गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कायम झाल्याने उरलंसुरल ही या अतिवृष्टीने हिरावून घेतल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

advertisement

बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली. नदीचे पात्र तब्बल एक किलोमीटर पर्यंत पसरलं आहे. अनेकांची घरं पाण्यात गेली आहेत. तर शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. अशैातच पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका महिलेला आणि तिच्या बाळाला बचावण्यात यश आलं. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं.

बीड जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेता बीड जिल्ह्याती शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. बीडमध्ये कालपासून जिल्ह्यात दोन दिवस मोठ्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे खबरादारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर कऱण्यात आलीये. दरम्यान, जिल्ह्यातील काही गावात अजूनही पूरस्थिती कायम आहे. त्यामुळे स्थानिकांचा संपर्कही तुटला आहे.

सोलापूरही पाण्याखाली, सुट्ट्या जाहीर

सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या तुफान पावसामुळे सीना नदीला पूर आला. मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील तालुक्यांना महापुराचा मोठा धोका निर्माण झाला. सीना नदीकाठच्या ग्रामस्थांनाही यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या 2 दिवसांपासून सीना नदीपात्रात पाणी साचल्याने शेती पाण्याखाली गेली. तर वैराग जवळील इर्ले गावातील मोहोळा माढा तालुक्याला जोडणारा बांधाराही पाण्याखाली गेला. त्यामुळे स्थानिकांचा संपर्कही तुटला आहे. पूरस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यात काय स्थिती?

जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील गोळेगाव येथे पाण्याचा वेढा पडला आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुुरु असल्याने गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळं गोदावरी नदीचं पाणी गावात शिरलं. गावातील काही नागरिकांना रात्रीच स्थलांतरित केलं गेलं. मात्र ही नेहमीची परिस्थिती असल्याने गावचं पुनर्वसन करण्यात यावं. अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सध्या गावातील नागरिक सुरक्षित असल्याची सांगितलं जातं आहे.

लातूरमध्ये पुराचा वेढा?

लातूर तालुक्यातील सावरगाव, धानोरी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे या गावातील नदीच्या पुलावरून पाणी आहेत. परिणामी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीकडे ज्योत घेऊन निघालेले भाविकही यामुळे पाणी ओसरे पर्यंत अडकून पडले होते. अनेक शेतकऱ्यांच्या पिकात पाणी घुसून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत तर शेत जमिनीही खरडून गेली आहेत. शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील संपूर्ण पिकं ही उध्वस्त झाल्यामुळे तात्काळ पंचनामे करून सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

अहिल्यानगरमध्ये शाळांना सुट्टी

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. नदी-नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक ठिकाणी घरात आणि शेत शिवारांत पाणी साचलं आहे. तर नद्यांच्या पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेत. प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. वाहून गेलेल्या रस्त्यांच्या पुलावर प्रशासनानं काम सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आभाळ फाटलं! संसार उद्ध्वस्त झाले, रस्ते बुडाले-गावंच्या गावं पाण्याखाली गेली, महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल