शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केला व्यवसाय, 3 लाख उलाढाल, शेतकऱ्यानं असं काय केलं?
यासोबतच महाराष्ट्रातल्या इतर भागालाही मुंबई हवामान विभागाने मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांसह वादळी वारे पावसाचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यासह पुढील ३ तासात अहिल्या नगर, धाराशिव, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांसह वादळी वारे आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. शिवाय, नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्लाही हवामान विभागाने नागरिकांना दिला आहे. अचानक पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. यासोबतच शेतकऱ्यांचीही तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
advertisement
देवीचे अलंकार आणि मुखवटे घडवणारे रहीम शेख, 120 वर्षांपासून कधीही पडू दिला नाही खंड!
बंगालच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या सर्वत्र राज्यभर पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊसाचा इशारा देण्यात आला होता. शिवाय, पुढचे दोन- तीन दिवस पाऊसाच्या ढगांचं सावट कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाने संकेत दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये सततच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. अनेक भागांमध्ये सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसला. नागरिकांच्या घरात शिरलेल्या पावसामुळे जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले.