बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील 16 मध्यम आणि 126 लघु प्रकल्प ओसंडुन वाहत आहेत. तर लहान-मोठा नदी नाले ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आष्टी,शिरूर ,पाटोदा, बीड, वडवणी,गेवराई ,अंबाजोगाई, परळी या तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा, अंगणवाडी, आश्रम शाळा महाविद्यालय यांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी म्हटले आहे.
advertisement
दुष्काळी भागांना पावसानं झोडपलं, बीडमध्ये पावसाचा कहर
राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढलाय. मराठवाडा आणि विदर्भासह नगर जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलंय..दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगरमधील पाथर्डी,शेवगाव,तसेच बीड जिल्ह्यात अनेक भागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसाच्या नॉन स्टॉप माऱ्यामुळे नागरिक प्रचंड बेहाल झालेत. तर काढणीला आलेली पीकं धोक्यात आल्यानं शेतकरी वर्गातही चिंता आहे. आष्टी तालुक्यातील कडा परिसरातील सहा गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. आष्टी तालुक्यातील कडा इथे पुराच्या पाण्यात 17 नागरिक अडकले होते. या नागरिकांची हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका करण्यात आली. तर गहू खेल भागात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात कांदा चाळ वाहून गेलीय.त्याचा व्हिडिओ समोर आला असून डोळ्यादेसत कांदा चाळ वाहून जाताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.बीडच्या पाटसरा गावातील शेत तलाव फुटल्यानं पाच ते सात एकर जमीन वाहून गेलीय.काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील राक्षसवाडी येथील छोटं धरण फुटलंय.त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेलंय.नागरिकांच्या घरासह शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसानही झालंय..माजलगाव प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने कडी नदी,कमलेश्वर नदीने धोक्याची पातळी ओलांडली.
हे ही वाचा :