नांदेड जिल्हयातील कंधार आगारातून सकाळीं ही बस निघाली होती. पुढे पातळपाटी जवळ सूर्यकांत किरतवाड हा व्यक्ती बस मध्ये चढला. त्याला वाहक संतोष कंधारे यांनी तिकीट मागितले. पण नवीन कायदानुसार आपल्याला मोफत प्रवासाची सुविधा असल्याचे सांगून त्याने आधार कार्ड दिला.
पुन्हा वाहकाने त्याला तिकीट काढण्याची मागणी केली. त्यावरून वाद घालून त्याने वाहकाला मारहाण केली . त्यावेळी प्रवासी आणि वाहक यांच्यात चालत्या बस मध्ये मारामारी झाली. या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात प्रवासी सूर्यकांत किरतवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पुढे काय घडलं हे कळू शकलेलं नाही. पण व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता प्रवाशी आणि वाहक यांच्यात जोरदार हातापायी होत आहे. बसमधलं कोणीही त्यांचं भांडण सोडवायला आलं नाही, उलट अनेक लोक व्हिडीओ काढत बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
