हंगोलीतून हेमंत पाटील यांच्या जागी बाबुराव कदम कोहलीकर यांना, तर यवतमाळ वाशीममधून भावना यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हेमंत यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. अखेर भाजपच्या दबावामुळे हेमंत यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. हेमंत पाटील यांना हा निर्णय मान्य नव्हता. अखेर शिंदे यांनी पाटील यांच्या पत्नीला यवतमाळ-वाशीममधून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले.
advertisement
हेमंत पाटील यांचे तिकीट कुणी कापले?
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी डावलण्यात आली. त्यामुळे दुःख झाल्याची खंत खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली. असून यवतमाळ वाशिम मतदार संघात विजय होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भावना गवळी आणि हेमंत पाटील यांचा पत्ता कट झाल्याने दोघांनाही दुःख झालं. मात्र, ते सर्व विसरून नव्याने कामाला लागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. शोले चित्रपट आपण पाहिलेला आहे. सलीम जावेद जसे शोले चित्रपटाचे पटकथा लेखक आहेत. तसेच आमच्या सर्व कहाणीचे लेखक हे भाजप आमदार मदन येरावार आणि शिवसेना आमदार संजय राठोड असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला. आमची स्क्रिप्ट यांनी लिहिल्याचेही ते म्हणाले. या दोघांमुळे उमेदवारी कापण्यात आली आहे. शेवटी आमचे नाते आहे आम्ही हे सर्व विसरुन कामाला लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणाजे यावेळी आमदार मदन येरावार हमेंत पाटील यांच्या शेजारीच उभे होते.
बुधवारी सायंकाळी भावना गवळी यांच्या जागी हमेंत पाटील यांच्यी पत्नी राजश्री पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राजश्री गुरुवारी यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.
वाचा - बीड लोकसभा निवडणुकीचं गणित बदलणार? ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय
आता भावना गवळी काय निर्णय घेणार?
या निर्णयामुळे संतप्त झालेल्या भावना गवळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, यवतमाळ-वाशीम जागेवरील आपला दावा अद्याप सोडलेला नाही. यवतमाळ-वाशीममधून त्या उमेदवारी दाखल करणार आहेत. महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजश्री पाटील यांच्याविरोधात भावना गवळी बंडखोरी करणार का, हे पाहणे बाकी आहे. भावना गवळी यांनी खरोखरच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला तर राजश्री पाटील यांना मोठे आव्हान पेलावे लागू शकते.