हिंगोलीत महायुतीची डोकेदुखी वाढवली
महायुतीत शिवसेनेने बाबुराव कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी रामदास पाटील, श्याम भारती महाराज व माजी जिल्हाध्यक्ष सुप्रीम कोर्टात वकिली करणारे शिवाजीराव जाधव या तिघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या तिघांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपकडून सांगण्यात आलं भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन, मंत्री भागवत कराड त्याचबरोबर आमदार श्रीकांत भारतीय यांनी हिंगोलीत श्याम भारती महाराज व रामदास पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे देखील घेतले. परंतु माजी जिल्हाध्यक्ष राहिलेल्या शिवाजीराव जाधव यांनी मात्र पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत महायुतीमध्ये बंडखोरी केली आहे.
advertisement
2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील जाधव यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यंदा मात्र उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये चांगली धुसफूस वाढली होती. त्यानंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबुराव कदम यांना उमेदवारी दिल्यानंतर ही दुसरी काहीशी कमी होईल असं वाटलं मात्र शिवाजीराव जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे हिंगोलीत महायुतीतला किडा वाढतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वाचा - रवी राणा-चंद्रशेखर बावनकुळेंच्या वादात बच्चू कडूंची उडी; थेट वर्मावर घाव
शिवाजीराव जाधव अपक्ष उमेदवार
पक्षाच्या वरिष्ठांनी माझी माझ्याशी संपर्क केला. परंतु, मी उमेदवारी मागे घेणार नाही. आम्ही रात्रंदिवस पक्ष वाढवायचा आणि पक्षाची युती झाल्यानंतर दुसऱ्याचा प्रचार केला आहे. आता मी माघार घेणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यानंतर मी समाज सेवा करेन. परंतु, आता मी माघार घेणार नाही, अशी भूमिका जाधव यांनी घेतली आहे.