हिंगोलीत राज ठाकरेंच्या सत्कारासाठी चेंगराचेंगरी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हिंगोलीमध्ये आगमन झालं आहे. शासकीय विश्रामगृहात राज ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये स्वागतासाठी झुंबड उडाली. यादरम्यान शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराची स्टील रेलिंग तुटल्याने मनसेचे कार्यकर्ते कोसळले आहेत. या घटनेत कुणीही जखमी झालं नसलं तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाचे मात्र नुकसान झालं आहे. पोलिसांनी यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांना बाहेर काढले आहे.
advertisement
वाचा - माझी लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? अजित पवारांनी एकदाचं सांगूनच टाकलं
मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी शहरात विविध बॅनर्स लावण्यात आलेत. परंतु, या बॅनरच्या माध्यमातून मनसेतील अंतर्गत गटबाजी समोर आलीय. पक्षातील ज्येष्ठ नेते अशोक तावरे यांचा वेगळा गट आणि जिल्हाध्यक्षांचा वेगळा गट असं चित्र या माध्यमातून समोर आलंय. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे बीड जिल्ह्यात कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. आणि याचीच तयारी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. राजकीय दृष्ट्या बीड जिल्ह्याला महत्त्व आहे. याच जिल्ह्यात मनसेचं अस्तित्व टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांसमोर आव्हान असणार आहे. आणि हा दौरा देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे. परंतु या अंतर्गत गटबाजीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.