याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील सुकळी वीर इथला रहिवासी प्रमोद मात्रे याचं आठवड्याभरापूर्वी लग्न झालं. वसमत तालुक्यातील सुकळी कोठारी इथं त्याच्या सासरवाडी आहे. काल सकाळी तो पत्नीला आणण्यासाठी सुकळी कोठारीला गेला. दुचाकीवरून गेलेला प्रमोद सासरी पोहोचलाच नाही. त्याचा काहीच संपर्क होत नसल्यानं घरच्यांनी शोधाशोधही केली.
प्रमोदचा शोध घेण्यासाठी कुटुंबिय बाहेर पडले. वसमत तालुक्यातल्या सुकळी कोठारी इथं जात असताना वाटेतच त्याची दुचाकी आढळून आली. आजुबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेतला तरी तो सापडला नाही. शेवटी कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठून प्रमोद बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. तरुणाच्या मोबाईल फोनचं लोकेशन ट्रेस केलं जात आहे. त्याच्या आधारे प्रमोदचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
advertisement