उद्धव ठाकरेंची सभा हिंगोलीत होत आहे. काही कार्यकर्त्यांकडून, उत्साही नेत्यांकडून जेसीबीद्वारे फुले किंवा हार अर्पण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तरी सर्वांना विनंती आहे की जेसीबी द्वारे फुले, हार घालण्यास मनाई केली आहे. ज्यांना हार घालायचा असेल त्यांनी प्रॉपर पोलिस विभागाकडे चेकिंग करूनच हार घालावेत. व्हीआयपी सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. असे काही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणीही जेसीबीने हार घालण्याचा प्रयत्न करू नये. हार घालायचा असेल तर तो पोलिसांनी चेक केलेला असावा असं हिंगोली पोलिसांनी म्हटलं.
advertisement
जेवढा भ्रष्टाचार गेल्या 10 वर्षांत झाला तेवढा तर ब्रिटिशांनीही...; राऊतांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल
नांदेड विमानतळावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हिंगोली येथील सभेसाठी एकाच गाडीतुन रवाना झाले. विमानतळावर कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळा बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर पुष्पवृष्टी केली. विमानतळाबाहेर स्वागतासाठी 21 जे सी बी आणण्यात आल्या होत्या. पण पोलीसांनी परवानगी नाकारल्याने जे सी बी परत पाठवण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी हाताने पुष्पवृष्टी करत स्वागत केले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हिंगोलिकडे रवाना झाले.
दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जेसीबीद्वारे स्वागताला परवानगी नाकरल्याच्या मुद्द्यावरून थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, स्वागत करण्यासाठी जेसीबीला परवानगी नाकारली कार्यकर्त्यांची भावना असते. हेच अजित पवार बाकी लोकांना नीती शिकवतात. अजित पवारांना फुल जरी घेऊन गेले तर राग येतो. त्यांना जेसीबी कसे चालतात? असा प्रश्न विचारला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार , देवेंद्र फडणवीस त्याचसोबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे देखील नांदेड विमानतळावर उतरले. यामुळे पोलीसांनी विमानतळावर सुरक्षा वाढवली आहे. मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे परभणी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी नांदेडहून हेलिकॉप्टरने परभणीला रवाना झाले तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी साडेबारा वाजता नांदेड येथून मोटारीने हिंगोली येथील जाहीर सभेसाठी जाण्यासाठी निघाले. शिंदे गट , आणि उध्दव गट आमने सामने येऊ नये म्हणुन पोलिसाकडून खबरदारी घेतली जात आहे.