लंडनहून परतली वाघनखे
महाराष्ट्र शासनाच्या विशेष प्रयत्नातून लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ही वाघनखे 3 वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. ही दुर्मिळ वाघनखे नागरिकांना पाहता यावीत यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचे प्रदर्शन भरवले जात आहे. सध्या ही वाघनखे साताऱ्यात असून, आता ती कोल्हापुरात येणार आहेत. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाने या प्रदर्शनाचे नियोजन केले आहे.
advertisement
शाही दसरा सोहळ्यानंतर उद्घाटनाची शक्यता
कोल्हापुरात येणारी ही वाघनखे खूप महत्त्वाची असल्याने, मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचा मानस आहे. त्यासाठी शाही दसरा सोहळ्यानंतर त्यांची वेळ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा : एसटीचं चाक जास्त फिरणार! दिवाळीत प्रवाशांना होणार नाही कसलाच त्रास, महामंडळाने काढला 'हा' आदेश
हे ही वाचा : मोठी बातमी! जगाच्या नकाशावर चमकणार 'महाबळेश्वर-पाचगणी', युनेस्को 'त्या' यादीत मिळालं मानाचं स्थान!