TRENDING:

चिपळूणमध्ये हिट अँड रनची घटना, अजित पवार गटाच्या नेत्याच्या मुलाने एकाला गाडीखाली चिरडलं

Last Updated:

मुंबई पुण्यासारखी हिट अँड रनची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजेश जाधव, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यातील  चिपळूणमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्याच्या मुलाने एका पादचाऱ्याला गाडीखाली चिरडून पळून जाण्याची घटना समोर आली आहे. मात्र, वेळीच स्थानिकांनी या बड्या नेत्याच्या पोराला पकडलं आहे. माजी तालुकाध्यक्ष जयेंद्र खताते यांचा मुलगा असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई पुण्यासारखी हिट अँड रनची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.  अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाचे माजी तालुकाध्यक्ष जयेंद्र खताते यांचा मुलाने भरधाव वेगात गाडी चालवून एका ५० वर्षीय पादचाऱ्याला चिरडलं. रस्त्यावर विवव्हळ असताना या पादचाऱ्याची मदत करण्याऐवजी घटनास्थाळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. पण, स्थानिकांनी अडवलं आणि त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केलं आहे.

advertisement

गाडीवरील पक्षाचे चिन्ह ओळखून राष्ट्रवादीच्या चिपळूणमधील बड्या नेत्याच्या मुलाला पकडलं आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते. मात्र पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जखमी पादचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती चिंताजनक होती. मात्र, रात्री उशिरा उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे चिपळुणमध्ये खळबळ उडाली आहे. एका निष्पाप ५० वर्षीय व्यक्तीचा जीव घेणाऱ्या अजित पवार गटाच्या नेत्याच्या मुलावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

advertisement

(सविस्तर बातमी लवकरच)

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चिपळूणमध्ये हिट अँड रनची घटना, अजित पवार गटाच्या नेत्याच्या मुलाने एकाला गाडीखाली चिरडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल