मिळालेल्या माहितीनुसार, कळंब-लातूर रस्त्यावर ही घटना घडली आहे. काही ऊसतोड मजूर हे शेतातून कळंबच्या बाजाराकडे रस्त्याने चालत येत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका कारने मजुरांना उडवलं. मजुरांना उडून वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात ६ मजूर जखमी झाले. जखमी मजुरांना तातडीने अंबाजोगाई शासकीय रुग्णालयाला हलवण्यात आलं. या अपघातात चार ऊसतोड मजूर अत्यावस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
ऊसतोड मजूर कळंब तालुक्यातील मंगरूळ गावचे असल्याचं कळतं आहे. घटनेची माहिती मिळताच जखमींच्या कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. कळंब शासकीय रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. जखमी असणारे मजूर सगळे आदिवासी पारधी समाजाचे असल्याचं कळतंय. अपघातग्रस्त वाहनावर लातूर जिल्ह्यातील पासिंग नंबर असल्यानं वाहन चालक लातूर जिल्ह्यातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. जखमींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. फरार कारचालकाचा शोध घेतला जात आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
