TRENDING:

Satara News : ट्रेकिंगला गेलेल्या गिर्यारोहकांवर हजारो मधमाश्यांचा हल्ला, ही एक चूक पडली महागात!

Last Updated:

Honey Bees attack on trekkers : सातारा जिल्ह्यातील वाईच्या पांडव गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pandav fort in Wai Satara : ट्रेकिंगला जाण्याचं फ्याड गेल्या काही दिवसांपासून तरुणाईमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. अनेक कॉलेजमधील तरुण तरुणी ट्रेकिंगसाठी उत्सुक असतात. पण अनेकदा वाट चुकणं किंवा घसरुण पडणे अशा दुर्घटना सर्रास होताना दिसतात. तर अनेकांचा मोठ्या ट्रेकवर गेल्यावर काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली होती. अशातच आता साताऱ्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पांडव गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला (Honey Bees attack on trekkers ) केल्याची घटना समोर आली आहे.
Honey Bees attack on trekkers
Honey Bees attack on trekkers
advertisement

परफ्युमच्या वासामुळे हल्ला

इंदापूर तालुक्यातील नरसिंहपुर येथील सहजन वाई तालुक्यातील पांडव गड येथे गिर्यारोहणासाठी गेले होते. तेथे त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला करून जखमी केलं. परफ्युमच्या वासामुळे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना तेथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं गेलं होतं. या पैकी दोघांना आज सातारा येतील रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. तर एक पुणे येथे जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले आहे.

advertisement

रेस्कू पथकाने वाचवलं

ट्रेकिंगला गेलेले सहाजण पांडव गड येथे गेले होते. तेथे त्यांच्यावर मधमाश्यानी हल्ला केल्यावर हे गिर्यारोहक सैरावैरा पळाले कोणाचा कोणाला थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे काही वेळ गोंधळ पसरला होता. त्यातील एकाने रेस्कू करणाऱ्यांना फोन केला स्थानिकांच्या मदतीने त्यांना खाली आणून प्राथमिक उपचार केले आणि हॉस्पिटलला दाखल केले. आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

advertisement

दरम्यान, हजारो मधमाश्यांच्या घेर्‍यात सापडलेल्या गिर्यारोहकांपैकी अल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाळ अवटी, गोपाळकर दंडवटे हे 4 जण गंभीर जखमी झाले होते. तर अन्य दोन तरुण बेशुद्ध पडले होते. त्यांना रेस्कू टीमच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं अन् रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

कोणती काळजी घ्याल?

अत्तराच्या आणि परफ्यूमच्या वासाने पांडवगडावर असलेल्या मधमाशांचे पोळे विचलित झाले आणि यातूनच मधमाशांनी थेट गिर्यारोहकांवर हल्ला चढवला. त्यामुळे ट्रेकिंगला जात असाल तर अत्तर किंवा परफ्यूम मारून जाऊ नये. तसेच जिथं मधमाश्यांचं पोळं असेल तिथं कोणताही कृती करू नये. ट्रेकिंगला जात असताना अंगभर कपडे घालून जाणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे माश्या, मच्छर आणि जंगली किड्यांपासून संरक्षण होऊ शकतं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara News : ट्रेकिंगला गेलेल्या गिर्यारोहकांवर हजारो मधमाश्यांचा हल्ला, ही एक चूक पडली महागात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल