हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे.यावेळी बोलताना नागेश मडके म्हणाले, मुंबईत गेल्यावर मी तुम्हाला शब्द दिला होता. त्यावेळी मराठ्यांना जिथपर्यंत आरक्षण मिळत नाही तिथपर्यंत हॉटेल भाग्यश्री बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. पण आता सरकारने आपल्याला आरक्षण दिलं आहे.त्यामुळे सरकारचा मी आभारी आहे.त्यामुळे पाटील साहेबांच्या आंदोलनाला यश आलं आहे.पाच दिवसांपासून पाटील साहेब आंदोलनाला बसले होते,असे नागेश मडके यांनी सांगितले होते.
advertisement
दरम्यान आता आरक्षण भेटल्यानंतर हॉटेल सूरू करणार असे मी बोललो होतो.त्यामुळे आता आरक्षण भेटलेलं आहे. त्यामु्ळे हॉटेल भाग्यश्री त्याच जोशामध्ये त्याच ताकदीने येत्या शुक्रवारपासून सेवेत हजर होणार आहे,अशी घोषणा करून नागेश मडके यांनी ग्राहकांना दिलासा दिला.
मराठा आंदोलकांना दिला मदतीचा हात
मराठायोद्धा या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये धाराशीव मधून हत्ती घेऊन मराठा बांधवासाठी मुंबईच्या दिशेने निघालो आहे. बिस्लेरीच्या पाण्यांच्या बॉटलने भरलेला हत्ती घेऊन निघालो आहे.आमच्या भावाला फोन लावून थेट बिस्लेरीच्या बॉटल्सनी हत्तीच भरायला लावला आहे.त्यामुळे नागेश मडकेंने धाराशीवमधून मुंबईत मराठा बांधवांसाठी पाणी पाठवत आहेत.
या व्हिडिओत नागेश मडके म्हणतात की, तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे.मनोज दादा जोपर्यंत आपल्याला मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तिथून उठू नका. जितकी आपल्याला कमी पडेल तितकं आम्ही आणून द्यायला तयार आहोत,असे देखील त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान सकल मराठा समाजाकडून हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे खुप आभार मानले आहेत. आणि या मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.