Tiranga Hotel : नाद करती काय, यायलाच लागतंय,आता पाच कापले आहेत आणि आता फक्त दुपारचे दोन वाजले आहेत, संध्याकाळी 4 चं नियोजन आहे. यायलाच लागतंय, कुठं हॉटेल तिरंगा...अशा आशयाची रिल्स तुम्ही तुमच्या इस्टाग्राम फिडवर नक्कीच पाहिली असेल. या सोशल मीडियावर फेमस असलेल्या हॉटेल तिरंगामध्ये आता पुन्हा एकदा पुराचं पाणी शिरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हॉटेल मालक लक्ष्मण भोसले यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या स्वप्नांना चुराडा झाला आहे.त्यामुळे ते खचले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे नदीला पुर आला आहे. या पुराचं पाणी अनेकांचा घरात,शेतात शिरलं आहे. हॉटेल तिंरगामध्ये देखील हे पाणी शिरलं आहे. या पुराच्या पाण्यामुळे मालक लक्ष्मण भोसले यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे देवा मागच्या वेळेस परीक्षा घेतली तरी अजून एकदा कारे घेतोस,असा सवाल ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारत आहेत.
महिन्याभरापुर्वी हॉटेलमध्ये आता होता पूर
बार्शी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या तिरंगा हॉटेलला पावसाचा फटका बसला होता. विश्वरूप नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे तिरंगा हॉटेलमध्ये पाणी शिरलं होतं. हॉटेलमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यामुळे हॉटेलमधील साहित्यांचा नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे हॉटेल मालक लक्ष्मण भोसले यांना अश्रू अनावर झाले होते. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
भाग्यश्री हॉटेलच्या मालकाने दिला धीर
तिरंगा हॉटेलचे मालक लक्ष्मण भोसले यांची ही भीषण परिस्थिती पाहून भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी त्यांना धीर दिला होता. आमचे धाराशीव जिल्ह्यामधले तिरंगा हॉटेलचे मालक त्याचे काही व्हिडिओ बघितले. त्यामुळे पुरामुळे त्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई शासनातर्फे मिळावी. युवा उद्योजकाला काय मदत होईल तितकी करण्यात यावी,अशी मागणी नागेश मडके यांनी केली आहे. त्याचसोबच खचून जाऊ नका भाऊ, धाराशीव जिल्हा तुमच्यासोबत आहे, हॉटेल भाग्यश्री, नाद करती काय हॉटेल तिरंगा, अशा धीर देण्याचा प्रयत्न नागेश मडके यांनी केला.