वडिलांच्या मालकीच्या संपत्तीचे स्वरूप महत्त्वाचे
सर्वप्रथम हे ठरवावे लागते की ती मालमत्ता स्वतःच्या कमाईतून वडिलांनी घेतलेली (Self-Acquired Property) आहे की पूर्वजांची पिढीजात मालमत्ता (Ancestral Property) आहे. जर वडिलांनी ती मालमत्ता स्वतःच्या मेहनतीने घेतली असेल, तर ती त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानली जाते. पण जर ती आजोबा, पणजोबा किंवा इतर पूर्वजांकडून आलेली असेल, तर ती पिढीजात मालमत्ता ठरते.
advertisement
स्वतःच्या मालमत्तेवर वडिलांचा संपूर्ण अधिकार
कायदेशीर दृष्टीने पाहता, वडिलांनी स्वतःच्या कमाईतून घेतलेल्या मालमत्तेवर त्यांचा पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे ते आपल्या इच्छेनुसार ती मालमत्ता कोणालाही दान, विक्री किंवा वसीयत स्वरूपात देऊ शकतात. या स्थितीत दुसऱ्या मुलाला कोणताही हक्क सांगता येत नाही. मात्र, जर वडील वृद्ध असतील, आजारी असतील किंवा त्यांच्यावर दबाव आणून मालमत्ता एका मुलाच्या नावावर केली गेली असेल, तर “अनुचित प्रभाव” (Undue Influence) म्हणून त्या व्यवहाराला आव्हान देता येते.
पिढीजात मालमत्तेवर सर्वांना समान हक्क
जर ती मालमत्ता पिढीजात (Ancestral Property) असेल, तर प्रत्येक मुलाला त्यावर समान हक्क असतो. हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार (Hindu Succession Act, 1956), मुलगा आणि मुलगी दोघांनाही पितृसंपत्तीवर जन्मतःच अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे वडील पिढीजात मालमत्ता एका मुलालाच देऊ शकत नाहीत. अशा वेळी दुसरा मुलगा न्यायालयात वाटणीची मागणी (Partition Suit) करू शकतो.
हक्क मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया
मालमत्तेची कागदपत्रे तपासणी - सर्वप्रथम त्या मालमत्तेचा स्वभाव ठरवण्यासाठी मालकी हक्काची कागदपत्रे, सातबारा उतारा, खरेदी-विक्री नोंदी पाहाव्यात.
नोटीस देणे -जर दुसऱ्या भावाने मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली असेल, तर प्रथम त्याला कायदेशीर नोटीस पाठवून वाटणीची मागणी करावी.
वाटणीसाठी न्यायालयात दावा दाखल करणे - प्रतिसाद न मिळाल्यास सिव्हिल कोर्टात “Partition Suit” दाखल करून आपल्या हक्काची मागणी करता येते.
मृत्यूपत्र रद्द करण्याची मागणी - जर वडिलांनी एका मुलाच्या नावावर मृत्यूपत्र केलं असेल आणि त्यात अनियमितता असल्याचे वाटत असेल, तर त्याला “Probate Court” मध्ये आव्हान देता येते.
