अर्धा जून उलटून गेला तरी देखील वाहन चालकांकडून पुरेसा प्रतिसात न मिळाल्याने आणि अजूनही अनेक वाहानंचं नबंरप्लेट बदलून न झाल्यामुळे आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. पण यासोबतच वाहनविभागानं एक वेगळा नियम लागू केला आहे. ज्याबद्दल प्रत्येत वाहान चालकाला माहित असणं गरजेचं आहे.
महाराष्ट्र शासनाने परिवहन विभागाकडून याबद्दल नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'दिनांक 01/04/2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याबाबतचा निर्णय घेतला असून अशा जुन्या वाहनांना यापूर्वी 30/06/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि HSRP बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने दिनांक 01/04/2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याकरिता दिनांक 15/08/2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक नंबरप्लेट बसविण्याकरिता दिनांक 15/08/2025 पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तथापि, दिनांक 15/08/2025 पर्यंत HSRP बसविण्यासाठी अपॉईंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.'
advertisement
याचाच अर्थ तुमच्या वाहानाचं नंबरप्लेटसाठी 15/08/2025 पूर्वी रजिस्ट्रेशन झालं असेल पण नंबरप्लेट लावलेली नसेल (उशीराची तारीख मिळाली असेल) तर कारवाई होणार नाही. पण जरा 15/08/2025 यातारखेपूर्वी रजिट्रेशन झालं नसेल तर मात्र या अशा वाहनांवर कारवाई केली जाईल. दिलेल्या माहितीनुसार असं देखील समोर येत आहे की ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे यानंतर तारीख वाढवून मिळणार नाही.
HSRP नंबर प्लेट नसल्यास किती दंड भरावा लागेल? रस्त्यावर अशी गाडी दिसली तर पोलीस काय कारवाई करतील?
परिवाहन विभागाने यावेळी तारीख तर वाढवली आहे. पण वाहनचालकांना इशारा देखील दिला आहे.